ETV Bharat / state

ताडोबात माया वाघिणीचा मृत्यू? वनविभाग सापडलेल्या मृत वाघाची करणार डीएनए चाचणी - know about Maya Tigress

Tiger Remain Found In Tadoba : ताडोबा क्वीन म्हणून ओळख असलेली माया वाघीण ऑगस्ट महिन्यापासून बेपत्ता आहे. मात्र शनिवारी ताडोबात वाघाच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले आहेत. त्यामुळे हे अवशेष माया वाघिणीचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वनविभागाच्या वतीनं या अवशेषाची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

Tiger Remain Found In Tadoba
बछड्यासह माया वाघिण
author img

By PTI

Published : Nov 19, 2023, 7:34 AM IST

Updated : Nov 19, 2023, 9:21 AM IST

चंद्रपूर Tiger Remain Found In Tadoba : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले आहेत. त्यामुळे हे अवशेष बेपत्ता वाघीण मायाचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वनविभाग या अवशेषाची डीएनए चाचणी करणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ताडोबाची क्वीन म्हणून ओळख असलेली माया ही वाघिण ताडोबातून 23 ऑगस्टपासून बेपत्ता आहे.

Tiger Remain Found In Tadoba
माया

ताडोबात आढळले वाघाच्या मृतदेहाचे अवशेष : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. याबाबतची माहिती वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. माया नावानं प्रसिद्ध असलेली वाघीण T-12 ही ताडोबा राखीव केंद्रातून ऑगस्ट महिन्यात बेपत्ता झाली होती. त्यामुळे सापडलेले अवशेष मायाचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सापडलेले अवशेष मायाचे आहेत का, हे शोधण्यासाठी वनविभाग डीएनए चाचणी करणार आहे.

Tiger Remain Found In Tadoba
माया वाघिणीची शोधमोहीम

वनविभाग करणार डीएनए चाचणी : ताडोबातील सेलिब्रिटी वाघीण माया ही बेपत्ता असून वनविभागाच्या वतीनं तिचा शोध घेण्यात येत होता. मात्र, ताडोबात वाघाच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले आहेत. 100 मिटर परिसरात हे अवशेष आढळून आले असल्यानं ते वनविभागात विखुरले गेल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं स्पष्ट होत असल्याचं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी स्पष्ट केलं. मात्र हे अवशेष मायाचेच आहेत का, याबाबत स्पष्टता येण्यासाठी बंगळुरू इथल्या नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी या प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. या डीएनए चाचणीचा अहवाल 30 नोव्हेंबरपर्यंत येणार असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं.

Tiger Remain Found In Tadoba
आढळलेले अवशेष

ताडोबातून माया झाली बेपत्ता : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सेलिब्रिटी वाघिण म्हणून मायाची ओळख होती. आपल्या आक्रमक स्वभावानं मायाची ताडोबात मोठी दहशत होती. मात्र ऑगस्ट महिन्यात माया अचानक गायब झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या वतीनं मायाचा शोध घेण्यात आला. मात्र अद्यापही मायाचा शोध लागला नाही. मात्र शनिवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाचे अवशेष आढळून आले. हे अवशेष बेपत्ता मायाचेच असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tiger Remain Found In Tadoba
माया

तब्बल 13 शावकांना दिला जन्म : माया ही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्राच्या पांढरपवनी भागातील प्रबळ वाघीण होती. या वाघिणीचा जन्म डिसेंबर 2010 मध्ये झाल्याची नोंद आहे. जून 2014 पासून ती पहिल्यांदा गर्भवती झाली. त्यानंतर 2015, 2017, 2020 आणि 2022 अशा पाच वेळा माया वाघिणीनं शावकांना जन्म दिला. एकूण 13 शावकांचं ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जैवविविधता वाढण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. परंतु, यातील काही शावक नैसार्गिक कारणांनी मरण पावली आहेत.

ऑगस्ट महिन्यात झालं शेवटचं दर्शन : माया वाघीण ही ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाची आकर्षणाचा केंद्र होती. पर्यटक खास मायाला बघण्यासाठी येत. माया आणि तिच्या शावकांसोबत खेळ-मस्ती करतानाचे अनेक क्षण कॅमेऱ्यात कैद झालेत आणि व्हायरल झाले. त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत नियमीत होणाऱ्या कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध पध्दतीनं होणाऱ्या संशोधनामध्ये 2014 पासून तिची नियमीत नोंद होत होती. परंतु मार्च 2023 ते मे 2023 या कालावधीत कॅमेरा ट्रॅपच्या मदतनं सुरु असलेल्या पाचव्या टप्प्यामध्ये तीची शेवटची नोंद झाली होती. ऑगस्ट 2023 मध्ये ताडोबा तलावाजवळील पंचधारा क्षेत्रामध्ये गस्त करत असलेल्या क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना तिचं शेवटचं दर्शन झालं होतं. यानंतर 1 ऑक्टोबरला ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरू झाल्यावर देखील तिचं दर्शन होत नसल्यानं पर्यटकांसाठी हा चिंतेचा आणि चर्चेचा विषय होत होता. यावेळी व्यवस्थापन देखील नुकताच प्रकल्प उघडला असून काही वाघ हे स्थलांतर करत असतात, त्यामुळे ती दिसत नसावी, असं वाटलं होतं.

150 कर्मचारी, पाच पथकं आणि ड्रोन कॅमेऱ्यानं शोध : माया दिसत नसल्यानं 7 ऑक्टोबरपासून मोठ्या प्रमाणात कॅमेरा ट्रॅप आणि नियमित गस्त करून शोध मोहीम सुरु होती. कोलारा वनपरिक्षेत्रात तिचा वावर असल्यानं हा परिसर देखील कर्मचाऱ्यांनी पिंजून काढला. या संशोधन मोहिमेच्या प्रक्रियेत T-07, T-114, T-115, T- 158, T-16, T-120, T- 138, T- 164, T- 168, T-181 आणि T-100 असे एकूण 11 विविध वाघ यामधील 6 माद्या आणि 5 नर निरीक्षणामध्ये आले. मात्र यात माया ( T-12) आढळून आली नाही. त्यामुळे शर्तीचा प्रयत्न म्हणून 16 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत कोर क्षेत्रातील कार्यरत सर्व वनाधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी, वन्यजीव संशोधक, विशेष व्याघ्र संरक्षण दलातील सर्व कर्मचारी तसेच रोजंदारी वनमजूर अशा एकूण 150 च्या वर असलेल्या वन कर्मचाऱ्यांची पाच पथकं करण्यात आले. त्या माध्यमातून कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. ताडोबाच्या कोर क्षेत्रातील परिसरात पायदळ गस्ती करण्यात आली. यासोबतच कॅमेरा ट्रॅप, ड्रोन कॅमेरा यांचा सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीनं वापर करण्यात आला. अशा पद्धतीचं युद्धपातळीवर कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आलं. या ऑपरेशनचं नेतृत्व ताडोबा कोअर विभागाचे उपसंचालक नंदकिशोर काळे यांनी केलं, तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ जितेंद्र रामगावकर, विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, कोर क्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे, जीवशास्त्रज्ञ प्राजक्ता हुशंगाबादकर यांचा सक्रिय सहभाग होता.

18 नोव्हेंबरला आढळले अवशेष : 18 नोव्हेंबरला ताडोबा वनपरिक्षेत्रातील ताडोबा नियतक्षेत्रातील (बीट) कंपार्टमेंट क्रमांक 82 मध्ये शोध पथकांना वाघाचे अवशेष निदर्शनास आले. अवशेषांमध्ये वाघाच्या सांगाड्याचा समावेश होता. ते सुमारे 100 चौरस मीटर वनक्षेत्रात विखुरलेले होते. हे सर्व अवशेष काळजीपूर्वक एकत्र करण्यात आले आणि पुढील संशोधनासाठी आणि विश्लेषणासाठी वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी आणि जीवशास्त्रज्ञांद्वारे डीएनए विश्लेषणासाठी नमुने गोळा करण्यात आले. वन्यजीव पशुवैद्यकांच्या माहितीनुसार सदर अवशेष कुजण्याच्या अत्यंत प्रगत अवस्थेत होते आणि पुढील शवविच्छेदन तपासणीसाठी योग्य नव्हते. तसेच, या अवशेषांच्या क्षेत्रात आणि सभोवतालील परिसरामध्ये कोणतीही मानवी हालचाल व कृती आढळून आली नाही. त्यामुळे वाघाचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचं स्पष्ट होत आहे. गोळा केलेले काही नमुने तत्काळ नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स (NCBS) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, बंगळुरू इथं डीएनए विश्लेषणासाठी पाठवले जाणार आहे. चालू असलेल्या वैज्ञानिक संशोधन व अभ्यासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या माहितीद्वारे माया (T-12) वाघिणीच्या डीएनए नमुन्यांशी मिळण्याची दाट शक्यता आहे. 30 नोव्हेंबरला याची अधिकृत पुष्टी होणार असून तूर्तास हे अवशेष माया वाघिणीचे असल्याचं मानलं जात आहे.

हेही वाचा :

  1. Man Animal Conflict 2023 : राज्यात मनुष्य आणि वन्यजीव संघर्षात वाढ; वर्षभरात 100 जणांनी गमाविले प्राण
  2. Tiger Translocation Program : चंद्रपुरात पकडलेल्या दोन वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात हलवले
  3. Tiger Attack in Sitabani Zone : जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांनी वाघिणीला डिवचले, पहा पुढे काय झाले?

Last Updated : Nov 19, 2023, 9:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.