चंद्रपूर - जगप्रसिद्ध अशा ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची सफारी करायची असेल तर बुकींग करण्यासाठी शासनाच्या इतर संकेतस्थळावर जावे लागायचे. मात्र, आता यासाठी पर्यटकांना इतरत्र जाण्याची गरज लागणार नाही. कारण ताडोबा व्यवस्थापनाने आता स्वतःचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित केले आहे. 1 ऑक्टोबरपासून ताडोबातील कोअर झोनची देखील सफारी सुरू होणार आहे. त्यासाठी येत्या 16 सप्टेंबरपासून यासाठीची बुकिंग करता येणार आहे. www.mytadoba.org या ठिकाणी जाऊन ही बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे पूर्वी किचकट समजली जाणारी बुकींग प्रक्रिया आता सुलभ होणार आहे.
या उपाययोजना असणार बंधनकारक
एका ओपन जिप्सी वाहनात 1 वाहनचालक, 1 मार्गदर्शक व 4 पर्यटक एवढ्याच व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. 10 वर्षाखालील व 65 वर्षावरील व्यक्तींना तसेच गर्भवती स्त्रियांना पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही.
प्रवेशद्वारावर सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक राहील. प्रवेशद्वारातून पर्यटकास प्रवेश देण्यापूर्वी सर्व पर्यटक, जिप्सी चालक, मार्गदर्शक यांचे शरीराचे तापमान हे थर्मर स्क्रिनींग, ईन्फ्रारेड थर्मामीटरने तपासण्यात येईल. हे सर्वसाधारण असल्यासच प्रवेश देण्यात यावा. ताप-सर्दी-खोकला असलेल्या, आजारी असलेल्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती नजीकच्या कोविड रुग्णालयात दिली जाईल.
प्रत्येकानी चेहऱ्यावर मास्क लावणे आवश्यक राहील व सोबत रुमाल ठेवणे आवश्यक राहील, मास्क शिवाय प्रवेशद्वारातून प्रवेश दिल्या जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत वापरलेला मास्क, हातमोजे, फेस शिल्ड, पाण्याच्या बाटल्या इत्यादी साहित्य वनक्षेत्रात अथवा अन्यत्र फेकले जाणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल.
पर्यटन वाहनात बसण्यापूर्वी सर्वांनी सॅनिटायजरने हात निर्जंतुक करणे बांधनकारक असेल. त्याशिवाय कोणालाही जिप्सीमध्ये बसू दिले जाणार नाही, प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशद्वारावर येण्यापूर्वी जिप्सीधारकांनी त्यांच्या जिप्सीमध्ये बसणाऱ्यांसाठी सॅनिटायजर ठेवणे बंधनकारक राहील. तसेच जिप्सीधारकांनी जिप्सीची प्रवेशद्वारावर येण्यापूर्वी जिप्सीची साफसफाई व सॅनिटाईज करणे आवश्यक राहील.
पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्यात येतील. प्रत्येक वापरानंतर स्वच्छतागृहे निर्जुंतीकरण करण्यात येईल.पर्यटन प्रवेशद्वारावर जिप्सीचे टायर निर्जंतुक (टायर बाथ) करण्याची सुविधा असणार असून तसे करणे बंधनकारक राहील. या व्याघ प्रकल्पात पर्यटनासाठी येणाऱ्या सर्वांसाठी व्याघ्र प्रकल्पाचे, राज्य सरकार, केंद्र सरकार, स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
स्पेशल : बुकिंगसाठी आता ताडोबाचे स्वतंत्र संकेतस्थळ; 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार कोअर झोनची सफारी - tadoba andhari tiger safari started from १ october
ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफारी करण्यासाटी पर्यटन वाहनात बसण्यापूर्वी सर्वांनी सॅनिटायजरने हात निर्जंतुक करणे बांधनकारक असेल. त्याशिवाय कोणालाही जिप्सीमध्ये बसू दिले जाणार नाही, प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशद्वारावर येण्यापूर्वी जिप्सीधारकांनी त्यांच्या जिप्सीमध्ये बसणाऱ्यांसाठी सॅनिटायजर ठेवणे बंधनकारक राहील. तसेच जिप्सीधारकांनी जिप्सीची प्रवेशद्वारावर येण्यापूर्वी जिप्सीची साफसफाई व सॅनिटाईज करणे आवश्यक राहील.