ETV Bharat / state

Tadoba Jungle Safari Bookings Scam: ताडोबातील ऑनलाइन महाघोटाळ्याला जबाबदार कोण? कसा झाला घोटाळा, वाचा सविस्तर - चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन

जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या ऑनलाइन बुकिंगमध्ये मोठा घोटाळा समोर आलायं. ज्या कंपनीला हे बुकिंगचे कंत्राट दिलं गेलं होतं, त्या कंपनीनं तब्बल सव्वा बारा कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देखील करण्यात आलीय.

Tadoba Andhari Tiger Project
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प
author img

By

Published : Aug 20, 2023, 7:35 AM IST

चंद्रपुर : चंद्रपूरमधील ताडोबाअंधारी व्याघ्र प्रकल्पाची करोडोची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तीन वर्षांचे कंत्राट पूर्ण झाल्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या प्रशासनाला जाग आली आहे. जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं. जेव्हा पाणी डोक्यावर गेलं, त्यावेळी पोलीस तक्रार करून ताडोबा व्यवस्थापन मोकळे झाले, असा आरोप होत आहे. या प्रकरणाबाबत 'चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन' या कंपनीची वनविभाग मंत्रालयाकडून स्वतंत्र चौकशी करणं आवश्यक झालं आहे.

काय आहे प्रकरण : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाची संपूर्ण जगाला भुरळ पडलीयं. त्यामुळं जगभरातुन याची ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी झुंबड उडते. याचे संपूर्ण कंत्राट ताडोबा व्यवस्थापणाने चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या कंपनीला दिले. अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर हे दोघे भाऊ या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. 2021 ते 23 या तीन वर्षांकरिता ऑनलाइन बुकिंगचे कंत्राट होते. मात्र, या दरम्यान या दोन्ही भावांनी पैशांचा मोठा अपहार केल्याचा आरोप आहे. या कंपनीला ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान यांना 22 कोटी 80 लाख 67 हजार 749 रुपये देणे होते. मात्र कंपनीनं केवळ 10 कोटी 65 लाख 16 हजार 918 रुपये सरकारला अदा केले.

प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होणार- करारनाम्याच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून तब्बल 12 कोटी 15 लाख 50 हजार 831 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले. त्यानुसार ताडोबा विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात पैशांची अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे.

ऑनलाइन बुकिंगचा मनमानी कारभार : ऑनलाइन बुकिंगचे कंत्राट हे ठाकूर बंधूकडे होतं. या माध्यमातून बुकिंग साईटमध्ये छेडछाड केली जायची, अशी माहिती समोर येत आहे. या माध्यमातून कधी कमी बुकिंग जागा तर कधी जास्त दाखवल्या जायच्या, याबाबत वरोरा विधानसभा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न देखील उपस्थित केला होता. चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या कंपनीनं 10 डिसेंबर 2021 ते 17 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाइन बुकिंगचे काम केले. तब्बल तीन वर्षे या कंपनीची सर्रासपणे अफरातफर सुरू होती. मात्र, ताडोबा व्यवस्थापनातील जबाबदार अधिकाऱ्यांना याचा सुगावा लागला नाही. तब्बल तीन वर्षांनी अधिकाऱ्यांना जाग आली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

12 कोटींचा अपहार : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात लेखापरीक्षण अहवालात 12 कोटींचा अपहार झाल्याचे समोर आले. त्यातही 2020-21, 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या कालावधीच्या दरम्यान झालेल्या लेखापरीक्षण अहवालानुसार ही बाब समोर आल्याचे सांगण्यात आले. वास्तविक त्रयस्थ कंत्राटावर लक्ष ठेवण्यासाठी लेखापरीक्षण अहवाल हा अत्यंत महत्वाचा असतो. मग, संबंधित अधिकाऱ्यांच्या निरीक्षणातून ह्या गंभीर बाबी सुटल्याच कशा? हा खरा प्रश्न आहे. या लेखापरीक्षण अहवालाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात आली. त्याचाच परिपाक म्हणजे तब्बल 12 कोटींचा अपहार झाला.

ताडोबातील एकाधिकारशाही नडली : कुठल्याही क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामासाठी सकस स्पर्धा गरजेची असते. मात्र, जेव्हा त्या क्षेत्रात एकाच संस्था व्यक्तीची एकहाती वर्चस्व निर्माण होते. त्यावेळी मनमानी कारभार सुरू होतो. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातदेखील हेच घडले. ताडोबाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ट्रॅप कॅमेरा असो की बॅटरीवर चालणाऱ्या जिप्सीचा प्रयोग, अशी कितीतरी महत्वाची कामे ठराविक कंपनीला डोळे झाकून देण्यात आली. बॅटरीचा प्रयोग देखील फसला असताना देखील ताडोबाचे अधिकारी याची पाठराखण करत होते. बघता बघता ताडोबा प्रशासनावर ठराविक कंपनीतील बंधूंचे वर्चस्व निर्माण झाले. हेच बंधू वरीष्ठ अधिकाऱ्यांना 'ब्रिफ' करायचे. त्यामुळे त्यांना प्रती अधिकारी समजले जायचे.

ऑनलाइन सफारीचा वादग्रस्त प्रयोग : कोरोनाच्या काळात जेव्हा ताडोबा पूर्ण बंद होते, त्यावेळी ऑनलाइन सफारीचा प्रयोग करण्यात आला. त्याचे कंत्राट ठाकूर यांना देण्यात आले. हे करत असताना वाघांची ओळख, त्याचा वावर, ते ठिकाण अशी सर्व गुप्त माहिती येथे जाहीर करण्यात येत होती. शिकारी टोळींना हे आयते आवरतन होत होते. याबाबत ईटीव्ही भारतने बातमी प्रकाशित केली असता ताडोबानं हा वादग्रस्त उल्लेख टाळणं बंद केलं होतं.

जिप्सीमालकांचे मानधन रखडलं : ऑनलाइन बुकिंगसह जिप्सीमालकांचे मानधन देण्याची जबाबदारीदेखील ठाकूर यांच्या कंपनीची होती. मात्र, हे मानधन देखील थकीत ठेवण्यात येत होते. ताडोबा बफर क्षेत्रात 15 सफारी गेट आहेत. प्रत्येक गेटमध्ये किमान 12 जिप्सी चालतात. बफर क्षेत्रातील सर्व जिप्सी मालकांचे जून महिन्याचे मानधन थकीत आहे.

मुख्य वनसरंक्षकांची प्रतिक्रिया : याबाबत वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर म्हणाले, आम्ही लेखापरीक्षण अहवालानुसार या रक्कमेचा अंदाज लावला आहे. जितकी रक्कम ताडोबाला नियमानुसार मिळायला हवी होती, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबत आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे पुढील कारवाई पोलीस योग्यरीत्या करतील, असा विश्वास मुख्य वनसंरक्षक रामगावकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. Tadoba Andhari Tiger Project : व्याघ्रसफारीचा देशातील एकमेव प्रयोग थंडबस्त्यात; प्रादेशिक वनविभागाच्या तीन सफारी सध्या बंद
  2. Melghat Tiger Reserve : देशात वाघांसाठी मेळघाट सर्वात सुरक्षित प्रदेश, 47 वाघांचे वास्तव्य
  3. Maya tigress in Tadoba : मायाच्या बछड्याची पर्यटकांना भुरळ; सुप्रिया सुळेंनी देखील केला व्हिडिओ शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.