ETV Bharat / state

नाईट सफारीसाठी महिला गाईड; ताडोबा व्यवस्थापनाचा उपक्रम - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प न्यूज

ताडोबामध्ये पहिल्यांदाच महिला गाईडला नाईट सफारीवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. वन विभागाच्या या मोहिमेत ताडोबा प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मोहर्ली गावातील सात महिलांनी मोठ्या उत्साह आणि धाडसाने सहभाग घेतला.

नाईट सफारीसाठी महिला गाईड
नाईट सफारीसाठी महिला गाईड
author img

By

Published : Jan 4, 2020, 9:36 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात महिला गाईडला 'नाईट सफारीवर' पर्यटकांना माहिती देण्यासाठी पाठवले जात नसे. मात्र, व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने 25 डिसेंबरपासून हे क्षेत्र देखील महिलांना खुले केले आहे. पर्यटकांना व्याघ्रदर्शन घडवण्यासाठी सात स्थानिक गाईड्स नाईट सफारीसाठी नेमल्या गेल्या आहेत.

नाईट सफारीसाठी महिला गाईड

ताडोबामध्ये पहिल्यांदाच महिला गाईडला नाईट सफारीवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. वन विभागाच्या या मोहिमेत ताडोबा प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मोहर्ली गावातील सात महिलांनी मोठ्या उत्साह आणि धाडसाने सहभाग घेतला. २५ डिसेंबरपासून या महिला गाईड जुनोना गेटवरच्या बफर भागामध्ये पर्यटकांसह जात आहेत.

हेही वाचा - थंडी वाढताच नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात भरला पक्ष्यांचा मेळा, पक्षीप्रेमींसाठी पर्वणी

आपली दैनंदिन कामे सांभाळून हे धाडस करताना या महिलांचा आत्मविश्वास दुणावला आहे. ताडोबाच्या परिघातील स्थानिकांना पर्यटन व्यवसायात संधी देण्याचे धोरण प्रकल्प व्यवस्थापनाचे आहे. अगोदर या महिला प्रकल्पात 'बर्ड वॉचर' म्हणून काम करत होत्या. त्यातील काहींची गाईड होण्याची तयारी होती. थोड्या प्रशिक्षणानंतर हे शक्य झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमाचे पर्यटकांनीही कौतुक केले आहे.

Intro: चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात नवीन वर्षाच्या सुरुवातीला नव्या घटनेची नोंद झाली आहे. आजवर महिला गाईडसना 'नाईट सफारीवर' पर्यटकांना माहिती देण्यासाठी पाठविले जात नसे. मात्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने 25 डिसेंबर पासून हे क्षेत्र देखील महिलांना खुले केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना व्याघ्रदर्शन घडवण्यासाठी सात स्थानिक गाईड्स नाइट सफारीवर नेमल्या गेल्या आहेत.
ताडोबा सफारीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच नाइट सफारीवर महिलांना गाइड म्हणून पाठवण्याची सुरुवात करण्यात आली आहे. वन विभागाच्या या मोहिमेत ताडोबा प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मोहर्ली गावातील मूळच्या पक्षी निरीक्षक असलेल्या ७ महिलांनी मोठ्या उत्साह, धाडसाने सहभाग घेतला. २५ डिसेंबरपासून या महिला गाइड जुनोना गेटवरच्या बफर भागामध्ये गाइडच्या भूमिकेत पर्यटकांसह जात आहेत. याआधी ताडोबा आणि परिसरात पर्यटनविषयक कामे मिळतील या आशेने या महिला व्यवस्थापनाकडे आशेच्या नजरेने बघत होत्या. आता आपली दैनंदिनी सांभाळून हे धाडस करताना त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. ताडोबाच्याच परिघातील स्थानिकांना पर्यटन व्यवसायात संधी देण्याचे प्रकल्प व्यवस्थापनाचे धोरण आहे. या महिला प्रकल्पात 'बर्ड वॉचर' रुपात निगडित होत्या. त्यातील काहींची गाईड होण्याची तयारी होती. थोड्या प्रशिक्षणानंतर हे शक्य झाल्याचे अधिकारी सांगतात. सुरुवातीपासून या बदलाला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद आहे.

बाईट १) वृंदा कडम , महिला गाईड, ताडोबा
बाईट ३) नरेश जैन , पर्यटक

बाईट : राघवेन्द्र मून, वनपरिक्षेत्राधिकारी, मोहर्ली

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.