चंद्रपूर - काँग्रेस-राष्ट्रवादी परिवाराची पार्टी आहे. यांचे कार्य फक्त स्वहीतासाठी असते. आघाडी सरकारने जनतेचे प्रश्न सोडविले असते तर मोदी पंतप्रधान झाले नसते. विकासाचे भरघोष पिक घ्यायचे असेल तर यूतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आव्हान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राजूरा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय धोटे यांच्या प्रचारार्थ आयोजित गोंडपिपरी येथील सभेत ते बोलत होते.
मी अर्थमंत्री आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीचा कोड नंबर फक्त मला माहीत आहे. तूम्ही संजय भाऊंना निवडून द्या मी तिजोरीचा कोड नंबर संजयभाऊंना लिहून देईन असे मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान गोंडपिपरी शहरात रँली काढण्यात आली. रँलीत नरेंद्र मोदी यांच्या डुप्लिकेटने लक्ष वेधून घेतले होते. ॲड. संजय धोटे, सूदर्शन निमकर, बबन निकोडे, अमर बोडलावार, दिपक सातपुते मंचावर उपस्थित होते.