ETV Bharat / state

आजच्या काळात कुठे मिळतो असा शिक्षक?; मुख्याध्यापकांच्या बदलीविरोधात विद्यार्थी-पालकांचे आंदोलन - Principal M Rangaraju transfer issue

विद्यार्थी गरीब असो की श्रीमंत त्यांच्यासाठी सातत्याने शैक्षणिकदृष्ट्या धावून येण्याचे काम प्राचार्य रंगाराजू यांच्या माध्यमातून होत आहे. एवढेच नव्हे तर कोरोना काळातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल त्यांनी पुढाकार घेतलेला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण झालेली आहे.

Students agitation in Chandrapur
विद्यार्थ्यांचे आंदोलन
author img

By

Published : Mar 20, 2021, 9:34 PM IST

Updated : Mar 20, 2021, 10:47 PM IST

चंद्रपूर - पूर्वी शिक्षकाला गुरुचे स्थान होते. मात्र कालांतराने शिक्षणाचे व्यवसायिकरण झाल्यानंतर हळूहळू शिक्षकदेखील याच यंत्रणेत भरडला गेला. परंतु आजही विद्यार्थ्यांना घडविण्याचा वसा हाती घेतलेले शिक्षक आहेत. मात्र, अशा शिक्षकांना त्रास देण्याचे काम वरिष्ठांनी सुरू केले. त्यामुळे अशा शिक्षकाची बदली करण्यात आली. प्राचार्य एम. रंगाराजू असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या बदलीविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी आक्रोश व्यक्त करत आंदोलन केले.

मागील चार वर्षांपासून विविध शैक्षणिक सुविधा केल्याने विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या प्राचार्यांची बदली झाल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आज सकाळी आठ वाजल्यापासून एक वाजपर्यंत भद्रावती येथील चांदा ऑर्डनन्स फॅक्टरी हायर सेकंडरी स्कूलच्या आवारामध्ये प्राचार्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली. एक वाजण्याच्या सुमारास शाळेच्या व्यवस्थापनाने धरणे आंदोलनावर बसलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले.

मुख्याध्यापकांच्या बदलीविरोधात विद्यार्थी-पालकांचे आंदोलन

हेही वाचा-मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे

शाळेचा चेहरा -मोहरा बदलला
भद्रावती येथील चांदा आयुध निर्माणीच्या उच्च माध्यमिक विद्यालयात स्थानिक आणि तालुक्यातील बरेच गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा मागील चार वर्षांपासून प्राचार्य प्रेम रंगाराजू यांच्या पुढाकारातून मिळत आहेत. प्राचार्य रंगाराजू हे चार वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात शाळेची शैक्षणिक प्रगती वाढलेली आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा त्यांनी स्वत:च्या पगारामधूनही पुरविलेल्या आहेत. विद्यार्थी गरीब असो की श्रीमंत त्यांच्यासाठी सातत्याने शैक्षणिकदृष्ट्या धावून येण्याचे काम प्राचार्य रंगाराजू यांच्या माध्यमातून होत आहे. एवढेच नव्हे तर कोरोना काळातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल त्यांनी पुढाकार घेतलेला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांकरfता पैशाने होणारे ट्युशन बंद करून शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा कसा वाढवला जाऊ शकतो यावर त्यांनी काम केले. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती उत्तरोत्तर वाढली आहे.

हेही वाचा-मराठा आरक्षण : अजून किती पिढ्या आरक्षण सुरू राहणार, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

विद्यार्थी आणि पालकांचा आक्रमक पवित्रा-
या शाळेमध्ये 35 शिक्षक कार्यरत आहेत. तर १, १०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपासून शाळेच्या व्यवस्थापनाकडून प्राचार्य रंगाराव यांना हटविण्याच्या हालचाली सुरू होत्या. शुक्रवारी दुपारी बारा वाजता प्राचार्यांना बदलीबाबतचे नोटीस मिळाले. त्यानंतर लगेच कार्यमुक्त करण्यात यावे, असा आदेश देण्यात आला. सदर प्रकाराची माहिती विद्यार्थ्यांना लागल्याने विद्यार्थी प्राचार्यांच्या बाजूने धावून आले. आज शनिवारी सकाळच्या पाळीत शाळा असताना शाळेच्या आवारातच अकराशे विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची पबदली रद्द करावी, यासाठी धरणे सुरू केले. एवढेच नव्हे तर पालकही पाल्यांच्या मदतीला येऊन कोणत्याही परिस्थितीत प्राचार्यांना या ठिकाणी ठिकाणावरून जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत विविध प्रचार्यांच्या समर्थनात घोषणाबाजी करून विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला. एकच्या सुमारास शाळा व्यवस्थापनाने धरणेवर बसलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न केला. प्राचार्यांच्या बदलीचे प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्राचार्य रंगाराजू सध्या भद्रावती येथेच आहेत. विद्यार्थ्यांच्या या पवित्र्यामुळे त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या समर्थनात पवित्रा घेतलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, याकरता प्राचार्य काही दिवस या ठिकाणी राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा-खासगी कार्यालयात कर्मचाऱ्यांची 50 टक्केच उपस्थिती; 'ई टीव्ही भारत'चा रियालिटी चेक

Last Updated : Mar 20, 2021, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.