ETV Bharat / state

Teacher's Day Special : एक शिक्षक असेही.. कधी मनपाच्या शाळांना मिळत नव्हते विद्यार्थी, आज प्रवेश देण्यासाठी नाही जागा - चंद्रपूर मनपा शाळात विद्यार्थी नाही

एकीकडे राज्यातील महानगरपालिकेच्या शाळांना घरघर लागली असताना चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस मनपाच्या शाळा सुधारत आहेत. या शाळा सर्व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त आहेत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता आणखी अधिक वर्ग, अधिकचे शिक्षक आणि अधिकच्या इमारतींची आवश्यकता आहे. अर्थात हे मनपाचे पदाधिकारी, अधिकारी, प्रशासनाचे सामूहिक यश आहे. मात्र यात नागेश नित गुरुजी यांचा सिंहाचा वाटा आहे.

municipal schools in Chandrapur
municipal schools in Chandrapur
author img

By

Published : Sep 5, 2021, 5:03 PM IST

चंद्रपूर - फार लांब नव्हे, 2015 ची गोष्ट. तेव्हा मनपाच्या शाळा अखेरच्या घटका मोजत होत्या. शाळेच्या इमारतींपासून शिक्षण यंत्रणेचे मनोबल सर्वकाही खचलेले होते. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटल्याने तब्बल 14 शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यातीलच एक असलेल्या सावित्रीबाई फुले शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक नागेश नित यांना या स्थितीचा मोठा धक्का बसला होता. अतिरिक्त ठरवले गेल्याने आपण राज्यात इतर कुठल्याही शाळेत फेकले जाऊ, अशी चिंता नित गुरुजी यांच्याप्रमाणे इतर सर्व शिक्षकांना होती. पण नित गुरुजी केवळ चिंता करीत बसले नाहीत तर त्यांनी असे होऊ नये यासाठी आपल्या सहकारी शिक्षकांना घेऊन पाऊल उचलले.

नागेश नित यांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन पालकांना मनपाच्या शाळेत पाठविण्याचे आवाहन केले. त्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण देण्याचे वचन दिले. रविवार, सणासुदीला कुठलीही सुट्टी न घेता हे काम सुरू ठेवले. याचे फळ त्यांना मिळाले. तब्बल 60 विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. आज मनपाच्या 29 शाळा आहेत. यातील अनेक शाळांचे अॅडमिशन फुल्ल झाले आहे. शिक्षकांऐवजी आता विद्यार्थी अतिरिक्त झाले आहेत. यासाठी शाळांचे वर्ग, शिक्षक आणि इमारती कमी पडू लागल्या आहेत. अविश्वसनीय वाटावे असेच हे परिवर्तन आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी नागेश नित यांचा यात सिंहाचा वाटा आहे. हे परिवर्तन कसे झाले, हा प्रवास नेमका कसा घडला, आज शिक्षक दिनानिमित्त हे आदर्श कार्य जाणून घेण्यासारखे आहे.

चंद्रपूर महानगरपालिका शाळांचा कायापालट
अंधारातून प्रकाशाकडे -

नागेश नित हे 1987 ला सहाय्यक शिक्षक म्हणून शिक्षण सेवेत रुजू झाले. 2014 ला ते चंद्रपूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. यापूर्वी अनेक शाळांचा प्रवास पूर्ण झाला होता. शिक्षकांचा मुलगा असल्याने रक्तातच शिक्षण आणि काहीतरी करण्याची धडपड होती. मात्र तो काळ कठीण होता. अनेक शिक्षक अतिरिक्त ठरल्याने दुर्गम भागात फेकले गेले होते. या शाळेत पहिली ते चौथीची सोय होती. विद्यार्थी केवळ 70 उरले होते आणि त्याची जबाबदारी केवळ तीन शिक्षकांवर. विद्यार्थ्यांना ना बसायला बेंच होते ना पिण्यासाठी स्वच्छ पाणी, इमारतही पूर्णपणे ढासळली होती. शाळेच्या 200 फुटांच्या परिघात चार कॉन्व्हेंट. अशावेळी विद्यार्थी आणणार कुठून हा प्रश्नच होता. मात्र त्यांनी हार मानली नाही. घरोघरी जाऊन त्यांनी मुलांना शाळेत पाठविण्याचे आव्हान केले. यादरम्यान सकाळी 7.30 ते 9.30 ला उन्हाळी शिबीर सुरू केले. ज्यात मुलांना योगा, सामान्यज्ञान, चित्रकला आदींचे प्रशिक्षण दिले जाऊ लागले. पालक आपल्या मुलांत घडणारे बदल प्रत्यक्ष अनुभवत होते. त्यांना याची गुणवत्ता कळली. याच वर्षी कधी नव्हे ते पहिल्या वर्गासाठी 60 विद्यार्थी दाखल झाले.

हे ही वाचा - तरुणीच्या नावाने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'हनीट्रॅप', दिल्लीच्या डॉक्टरला दोन कोटींचा गंडा

स्वतःच्या खिशातून सुरू केले वर्ग -

शासनाचे शिक्षण हे पहिलीपासून सुरू होते. तर आता कॉन्व्हेंटचा जमाना आहे. अतिसामान्य वर्गातील लोक देखील आपल्या पोटाला चिमटा घेत आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये धाडतात. अशावेळी कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला मुलगा पहिल्या वर्गात शिकायला कसा येणार हाही एक मूलभूत मुद्दा आहे. मग शाळेत केजी-1 केजी-2 सुरू करण्याचे आणि त्यासाठी दोन शिक्षिका ठेवायच्या हे ठरले. पण यास शासनाची मान्यता नाही, मग स्वतःच्या पगारातून या शिक्षिकांना मानधन देण्याचे ठरले आणि अशा पध्दतीने 2015 ला उद्याच्या शैक्षणिक वटवृक्षाच्या रोपट्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. याच वर्षी शाळेत सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गाला देखील मान्यता मिळाली. अशाच पद्धतीने 11 शाळांत केजीची सुविधा आहे ज्यात 27 शिक्षिका कार्यरत आहेत.

अधिकारी पद स्वीकारले पण शिक्षकाची जबाबदारी सोडली नाही -

नित गुरुजी यांच्या कार्याची दखल तात्कालिक आयुक्त संजय काकडे यांनी घेतली. महापालिकेत शिक्षणाधिकारी हे पद आहे. जर त्यांना ही जबाबदारी दिली तर इतर मनपाच्या शाळांचा देखील कायापालट होऊ शकेल या उद्देशाने काकडे यांनी या पदाची धुरा सांभाळण्याची विनंती नित गुरुजी यांना केली. यासाठीच त्यांनी इतर अधिकाऱ्याला येथे रुजू करून घेतले नाही. पण ही जबाबदारी घेतली तर निव्वळ अधिकारी म्हणून राहावे लागेल, शिवाय आपल्या शिकविण्याच्या ध्यासापासूनही दूर राहावे लागेल. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली खरी पण सावित्रीबाई फुले शाळेचे मुख्याध्यापक म्हणूनच. त्यांना 2016 ला शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला.

हे ही वाचा - नागपूर : पाण्याचा अंदाज न आल्याने कन्हान नदीत 5 तरुण बुडाले

शिस्तीसाठी निलंबनाचे सत्र -

बदल घडवायचा असेल तर त्यासाठी शिस्त आणि कठोर परिश्रमाची गरज असते. हे करायचे असेल तर काही कठोर पाऊले उचलावी लागतात. मात्र मनपाचे आधिकारी आणि पदाधिकारी यांनी नित गुरुजी यांना पाहिजे तो निर्णय घेण्याची आणि त्यात कुठलीही आडकाठी निर्माण होणार नाही, याची हमी दिली होती. त्यामुळे नित गुरुजी यांनी तीन कामचुकार शिक्षकांना थेट निलंबित केले. त्यामुळे इतर 'चलता है' म्हणणाऱ्या शिक्षकांना जरब बसली.

केंद्र सरकारची दखल आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचे आमंत्रण -

चंद्रपूर मनपाच्या शाळांत सातत्याने वाढत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येची दखल 2016 ला थेट केंद्र सरकारने घेतली. पाचगणी येथे होणाऱ्या चार दिवसीय आंतराष्ट्रीय मुख्याध्यापक परिषदेचे आमंत्रण नित गुरुजींना मिळाले. ज्यात देशभरातील आदर्श मुख्याध्यापक येणार होते. यासाठी महाराष्ट्रातील केवळ पाच मुख्याध्यापकांनाच निवडण्यात आले होते. आंतराष्ट्रीय मान्यवरांसह देशाचे केंद्रीय सचिव स्वतः या परिषदेला उपस्थित होते. बहुभाषिक देश त्यातील विविध राज्यातील मुख्याध्यापक यामुळे प्रत्येकाला आपल्या भाषेत आपली यशोगाथा सांगण्याची मुभा होती. त्याभाषेतुन इतर भाषेत लगेच तो ध्वनी भाषांतरित होण्याचे आधुनिक तंत्रज्ञान तिथे होतं. यावेळी चंद्रपूर मनपाच्या शाळांचा कायापालट करण्यासाठी काय काय प्रयत्न केले हे नित गुरुजींनी सर्वांसमोर सांगितले. अनेकांच्या मार्गदर्शनातून त्यांनीही बरेच काही तिथे शिकले.

राज्याचे शिक्षण आयुक्त थेट कॉल करतात तेव्हा -

राज्याचे शिक्षण आयुक्त नंदकुमार हे देखील या परिषदेत होते. परिषद आटोपून परत आले असता नित गुरुजींना अचानक थेट नंदकुमार यांचा फोन आला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी थेट बोलायचे असल्याने सर्वांना एका ठिकाणी गोळा करण्यास सांगितले. मात्र, विद्यार्थ्यांचे पालक कष्टकरी, मजुरीवर जाणारे. दिवसाची मिळकत बुडवून ते शाळेत कसे येणार, हा प्रश्न होता. मग आयुक्त यांनी किमान दहा पालकांचे फोन नंबर त्यांना मागितले. त्यांच्याशी संपर्क केला. खरंच तुम्ही आपल्या पाल्याच्या शिक्षणाबाबत समाधानी आहेत का, वाटेत शासनाच्या इतर शाळा असताना देखील इतक्या दूर याच शाळेत आपल्या मुलांना का पाठवता, असे सर्व प्रश्न त्यांनी विचारले. पालकांच्या उत्तराने त्यांचे समाधान झाले.

शाळा झाल्या स्मार्ट मतदान केंद्र -

यापूर्वी तत्कालीन महापौर अंजली घोटेकर आणि अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने अनेक शाळांतील महत्वाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. मात्र अजूनही बरेच काही करायचे होते. 2017 ला मनपाची निवडणूक आली. मनपाच्या शाळा या यावेळी मतदान केंद्र होतात. मग हे मतदान केंद्र स्मार्ट का होऊ नये. एक तर असे मॉडेल तयार होईल आणि कायमस्वरूपी शाळेचे सुशोभिकरण देखील होणार. त्याला प्रशासनाने निधी दिला. या माध्यमातून शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. वेगवेगळ्या रंगांनी, चित्रांनी शाळेला सजविण्यात आले. त्यामुळे मनपा शाळेच्या इमारती आकर्षक झाल्या.

मनपाच्या शाळा झाल्या डिजिटल -

आजकालचे शिक्षण आधुनिक झाले आहे. ई-लर्निंगने शिक्षण हे मुलांना जास्त पसंतीस पडते. मनपा शाळेत ही सुविधा नव्हती आणि मनपाकडे देखील यासाठी इतका फंड नव्हता. मग आयुक्त काकडे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांची भेट घेतली. त्यांनी या उपक्रमासाठी 27 लाखांचा निधी मंजूर केला. 29 पैकी 14 शाळांना ई-लर्निंगची सुविधा दिली. तर उर्वरित 10 शाळांना 40 इंची स्मार्ट टीव्ही देण्यात आल्या. या माध्यमातून आज सर्व शाळा डिजिटल झाल्या आहेत.

त्या 24 शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार -

विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने त्यानुसार मनपात शिक्षकांच्या जागा देखील तयार झाल्या होत्या. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या 24 शिक्षकांना मनपाच्या शाळेत रुजू करून घेण्याचे आदेश आले. पण हे सर्व शिक्षक 100 टक्के अनुदानित शाळेतून आलेले, त्यातही सर्वांनी पन्नाशी गाठलेली. जे सुट्टी मिळाली के थेट आपल्या गावी परत जाणार. अशा शिक्षकांच्या हातून विद्यार्थी कसे घडणार हा प्रश्नच होता. त्यामुळे या शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार देण्यात आला. बराच राजकीय दबाव आला. प्रकरण शिक्षण आयुक्तांपर्यंत गेले मात्र तरीही हा निर्णय कायम ठेवण्यात आला. अखेर नव्या पद्धतीने राज्याच्या परीक्षेनुसार नव्या शिक्षकांची भरती करण्यात आली.

विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी -

ज्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धडे येथे दिले जातात त्याचप्रमाणे येथील विद्यार्थी देखील चमकदार कामगिरी करीत आहे. 2019 मध्ये नागपूर येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विदर्भास्तरीय 'टाकावूपासून टिकाऊ' वस्तू तयार करण्याची स्पर्धा घेतली होती. यात संपूर्ण विदर्भात चंद्रपूर मनपाची विद्यार्थिनी अव्वल आली. याच प्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार एक शिष्यवृत्ती परीक्षा घेते ज्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वर्षाला 48 हजार मिळतात. 2020 मध्ये पहिल्यांदाच ही परीक्षा मनपाच्या विद्यार्थ्यांनी दिली. 9 पैकी तब्बल 3 मुले यात उत्तीर्ण झाली. यातील एकाचा केवळ एक मार्काने मेरिट हुकला तर इतर दोघे मेरिटमध्ये आले. यावर्षी या परीक्षेत 40 मुले बसविण्याची मनपाची तयारी आहे. त्यानुसार त्यांना पूर्णतः वेगळे शिक्षण आणि वेगळी तुकडी करण्याचा मानस आहे.

एकीकडे राज्यातील महानगरपालिकेच्या शाळांना घरघर लागली असताना चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस मनपाच्या शाळा सुधारत आहेत. आज मनपाच्या 29 शाळांत तब्बल 3 हजार 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळा सर्व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त आहेत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता आणखी अधिक वर्ग, अधिकचे शिक्षक आणि अधिकच्या इमारतींची आवश्यकता आहे. अर्थात हे मनपाचे पदाधिकारी, अधिकारी, प्रशासनाचे सामूहिक यश आहे. मात्र यात नागेश नित गुरुजी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणून राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या हस्ते त्यांना आदर्श शाळेचा पुरस्कार देण्यात आला तर 2020 मध्ये राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते त्यांना आदर्श मुख्याध्यापक म्हणून सन्मानित करण्यात आले. आज शासकीय शिक्षण पद्धती जीवित आणि वृद्धिंगत करायची असेल नित गुरुजींसारख्या अनेक शिक्षकांची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. तरच समाजातील उपेक्षित, वंचित वर्गाला खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.