ETV Bharat / state

विकृतीचा कळस! चंद्रपुरात तरुणावर 14 जणांचा अनैसर्गिक अत्याचार, तरुणाची आत्महत्या - चंद्रपूर विद्यर्थी आत्महत्या

शहरात बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अभ्यासिकेत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 18 जानेवारीला समोर आली होती.

Chandrapur
चंद्रपुरात तरुणावर 14 जणांचा अनैसर्गिक अत्याचार
author img

By

Published : Jan 21, 2020, 11:49 AM IST

Updated : Jan 21, 2020, 4:22 PM IST

चंद्रपूर - शहरात बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अभ्यासिकेत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 18 जानेवारीला समोर आली होती. या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यावर वसतीगृहातील त्याचे सहकारीच त्याचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार मागील 1 वर्षापासून सुरू होता. त्यामुळेच त्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 11 विद्यार्थी आणि 3 वसतीगृह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

शीलवंत नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी

हेही वाचा - चंद्रपुरात सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर

5 जानेवारीला पीडित विद्यार्थ्याचा वाढदिवस होता. यादिवशी देखील जवळपास 14 जणांनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. यामुळेच त्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सोमवारी पोलिसांना तपासात एक वही आढळली, ज्यात त्या मुलाने त्याच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती नमूद केली आहे. मागील एक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना त्या होस्टेलचे अधिकारी काय करत होते? त्यांना याची कल्पना आली नाही का? हा सर्वात मोठा प्रश्न यातून निर्माण झाला आहे.या प्रकरणात पोलीस वसतीगृहाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करत आहेत.

Intro:
चंद्रपूर : शहरातील सेवादल छात्रावासात बारावी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अभ्यासिकेत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 18 जानेवारीला समोर आली होती. या प्रकरणात ईटीव्ही भारतच्या हाती अत्यंत धक्कादायक माहिती लागली आहे. यात सिध्दार्थचे होस्टेलचे सहकारी त्याचे लैंगिक शोषण करीत होते. मागील एक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. 5 जानेवारीला सिध्दार्थचा वाढदिवस होता यादिवशी देखील त्याच्या जवळपास 12 ते 15 मित्रांनी त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. यामुळेच सिद्धार्थने गळफास लावून आत्महत्या केली होती. काल पोलिसांना तपासात एक वही आढळली ज्यात सिद्धार्थने त्याच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती नमूद केली आहे. मागील एक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना सेवादल होस्टेलचे अधिकारी काय करीत होते? त्यांना याची पुसटशीही कल्पना आली नाही का? हा सर्वात मोठा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. जर वेळीच यावर कारवाई झाली असती तर आज एका निष्पाप मुलाचा जीव वाचला असता. या प्रकरणात पोलीस होस्टेलच्या अधिकाऱ्यांची चौकशी करीत आहे.

Body:.Conclusion:
Last Updated : Jan 21, 2020, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.