चंद्रपूर - राज्याचे ऊर्जा, आदिवासी कल्याण, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे आज आणि उद्या दोन दिवसाच्या चंद्रपूर दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देऊन शासकीय कामांचा आढावा घेणार आहेत. वेकोली प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तसेच वनहक्क पट्टे याविषयी चर्चा करून जनता दरबारात उपस्थित राहणार आहे. तसेच महापालिकेत देखील आढावा बैठक घेणार आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
१९ फेब्रुवारी
सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत विविध विभागांच्या शासकीय बैठका
सकाळी ९ ते १० जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राखीव
सकाळी १०.१५. ते १२ महापालिका चंद्रपूर येथे बैठक
दु. १२.३० ते १.३० शिनाळा (ता.चंद्रपूर) येथील परिसरातील वेकोली प्रकल्पग्रस्त तथा वनहक्क पट्टे, जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आयोजित "जनता दरबारास" उपस्थिती
दु.२.वा.बल्लारपूर कडे रवाना
दु २.२० ते ३ बल्लारपूर शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठक
दु.३ वाजता जिवतीकडे रवाना
दु. ४ ते ५ जिवती तालुक्यातील "कुरसंगी गुडा" या गावाला विद्युत पुरवठा सुरू करण्याच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती
सायं.५ ते ६ नवनिर्वाचित जिवती नगर पंचायत पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ व पदग्रहण समारंभास उपस्थिती
सायं. ६ ते ७ राखीव
रात्री ७ वा.चंद्रपूर कडे रवाना व मुक्काम
२० फेब्रुवारी
सकाळी ८ वाजता भद्रावतीकडे रवाना
स. ८.३० ते ९ भद्रावती तालुक्यातील कर्नाटक एम्प्टा कोळसा खाणीच्या प्रकल्पग्रस्तांच्या व कामगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा
स.९.१० ला शिवजयंती निमित्त नगर परिषद, भद्रावती समोरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन
स. ९.३० ते १० भटाडी-नंदोरी येथे शिवजयंती निमित्त आयोजित ग्राम स्वच्छता कार्यक्रमास उपस्थिती
स. १०.३० ते ११ चिमूर तालुक्यातील शिष्टमंडळासोबत चर्चा
स.११ ते १२ वरोरा तालुक्यातील उद्योजक, अधिकारी व तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठकीस उपस्थिती
दु. १२ वाजता दहेगाव मार्गे हिंगणघाटकडे रवाना