ETV Bharat / state

इतरांसाठी सण पण त्याच्यासाठी 'वन'; या आहेत जंगलात गस्त घालणाऱ्या वाघिणी - chandrapur district news

देशातच नव्हे तर जगात ताडोबा-अंधारी राष्ट्रीय व्याघ्रप्रकल्पाची ख्याती आहे. तब्बल शंभराहून अधिक वाघांचे हे घर आहे. त्यामुळे त्यांचे संगोपन, संवर्धन तसेच संरक्षणाची जबाबदारी ताडोबा प्रकल्प व्यवस्थापनाकडे आहे. त्याचे उत्तम नियोजन येथे केले जाते. मात्र, याचे खरे शिपाई आहेत ते वनरक्षक. कारण चोवीस तास डोळ्यात अंजन घालून ते जंगलाची गस्त घालत असतात. पूर्वी वनरक्षक पद हे पुरुषांची मक्तेदारी समजले जायचे. मात्र, आता या क्षेत्रात महिला आपले अधिराज्य गाजवीत आहे.

specail story of women forester in chandrapur
इतरांसाठी सण पण त्याच्यासाठी 'वन'; या आहेत जंगलात गस्त घालणाऱ्या वाघिणी
author img

By

Published : Aug 21, 2020, 4:24 PM IST

Updated : Sep 3, 2020, 7:24 PM IST

चंद्रपूर - ज्या क्षेत्रात पुरुषांचा पारंपारिकरित्या दबदबा होता, ज्यात कमालीची जोखीम होती त्या क्षेत्रात देखील महिलांनी आपला भक्कम ठसा उमटवला आहे. आपल्या कर्तव्यात तसुभरही कमी न पडता सोबत संसाराचा गाडा देखील त्या हाकत आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात कार्यरत महिला वनरक्षकांचे उदाहरण हे असेच आहे. या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत आपले कर्तव्य अत्यंत चोखपणे बजावत आहेत.

इतरांसांठी असतो 'सण', पण यांच्यासाठी 'वन'....

देशातच नव्हे तर जगात ताडोबा-अंधारी राष्ट्रीय व्याघ्रप्रकल्पाची ख्याती आहे. तब्बल शंभराहून अधिक वाघांचे हे घर आहे. त्यामुळे त्यांचे संगोपन, संवर्धन तसेच संरक्षणाची जबाबदारी ताडोबा प्रकल्प व्यवस्थापनाकडे आहे. त्याचे उत्तम नियोजन येथे केले जाते. मात्र, याचे खरे शिपाई आहेत ते वनरक्षक. कारण चोवीस तास डोळ्यात अंजन घालून ते जंगलाची गस्त घालत असतात. पूर्वी वनरक्षक पद हे पुरुषांची मक्तेदारी समजले जायचे. मात्र, आता या क्षेत्रात महिला आपले अधिराज्य गाजवीत आहे.

163 पैकी तब्बल 67 वनरक्षक पदावर महिला कार्यरत आहेत. दररोज जाऊन आपल्या क्षेत्रात गस्त घालणे, जंगल-वन्यजीवांचा आढावा घेणे, संशयास्पद हालचालीवर नजर ठेवणे, आपल्या क्षेत्रातील स्थानीक नागरिकांशी संवाद साधणे, जंगलात अतिक्रमण होऊ न देणे, ह्या सर्व माहितीची नोंद ठेवणे ही सर्व त्यांच्या कामाचा भाग आहे. यादरम्यान, कधी थेट वाघांशी सामना होतो तर कधी आरोपींना अटक करताना तर कधी जंगलातील अतिक्रमण हटवताना दोन हात करावे लागतात. वनरक्षक वृक्षाली काटकर यांच्याकडे देवाडा बीट हे क्षेत्र आहे. त्यांना आलेला अनुभव अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारा आहे. देवाडा बिटात प्राण्यांची प्रगणना सुरू असताना त्या परत येत होत्या. सोबत दोन कुटी मजूर, एक फायर वॉचर, एक मदतनीस असे चार जण होते मात्र सर्वात समोर वृक्षाली होत्या. अचानक गुरावण्याचा आवाज आला आणि समोर एक धष्टपुष्ट आणि खवळलेली वाघीण दिसली.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : कोल्हापुरात गाईच्या शेणापासून बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

अवघ्या काही पावलांच्या अंतरावर असलेली ही वाघीण अंगावर येण्याचा प्रयत्न करीत होती. सर्वच घाबरून गेले होते पण पळून जाणे म्हणजे सपशेल मरणे हे सर्वांना ठाऊक होते. त्यामुळे आहे त्याच जागी सर्वजण थांबले. आणि लाठ्या काठ्या दगडावर आपटू लागले. हे पाहून वाघीण मागे जायची आणि थोड्या वेळात पुन्हा धावून यायची. हा जीवघेणा लपंडाव जवळपास अर्धा तास सुरू होता. त्या वाघिणीला दोन बछडे होते, त्यांच्या सुरक्षेसाठी ती अशी करीत होती. अखेर ती परत गेली आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास घेतला, असे त्यांनी सांगितले. वृक्षाली यापूर्वी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात होत्या. तिथे सोबत मदतनीस नसल्याने स्वतः दुचाकी घेऊन जंगलात फिरावे लागत होते. अनेक अशा दुर्गम ठिकाणी दुचाकी देखील जाऊ शकत नव्हती. तेव्हा देखील काम करावे लागत होते असे त्यांनी सांगतले.

तर, ममता गायकवाड यांच्या क्षेत्रात एकूण तीन बछडे असलेल्या वाघिणी आहेत. अजून त्यांचा सामना कधी झाला नसला तरी नेहमी सावध राहावे लागते. शिकारीचे आरोपी पकडताना तर गावकऱ्यांशी अनेकदा संघर्ष करावा लागतो. महिला समोर येतात, धक्काबुक्की करतात, शिवीगाळ करतात अशा परिस्थितीत देखील विचलित न होत्या या महिला वनरक्षकांना आपले कर्तव्य चोखपणे बजावावे लागते, असे ममता यांनी सांगितले. मात्र हे सर्व करत असताना घराकडेही लक्ष द्यावे लागते. नोकरी ही प्राथमिकता असली तरी गृहिणीची सर्व जबाबदारीही पार पाडावी लागते.

एकूणच, या महिलांसाठी हे तारेवरची कसरत आहे. सणासुदीला जेव्हा सर्व घरात लगबग असते त्यावेळी या महिलांना वर्दी घालून जंगलात गस्तीवर जावे लागते आणि परत आल्यावर सणासाठीची सर्व कामेही करावी लागतात. यामुळेच 'सर्वांसाठी सण पण आपल्यासाठी वन' ही म्हण या महिला कर्मचाऱ्यांत लोकप्रिय आहे. हे सर्व करण्यासाठी वाघिणीचे काळीज आणि स्त्रीची ममता लागते. या दोन्ही भूमिका त्या यशस्वीपणे निभावत आहेत. म्हणूनच खऱ्या अर्थाने, या महिला ताडोबात गस्त घालणाऱ्या वाघिणी आहेत.

जीव धोक्यात घालून पार पाडतात कर्तव्य -

गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या रजा मिळतात.प्रसूतीपूर्व तीन महिने आणि त्यानंतर तीन महिने. म्हणजे अवघ्या तीन महिन्याच्या बाळाला सोडून नोकरी करणे अवघड आहे. त्यामुळे या महिला जोखीम पत्करून शक्य़ होईल तेवढे दिवस नोकरी करतात. या महिलांचे काम शारीरिक कसरतीचे आहे त्यामुळे शासनाने याचा विचार करून या महिलांना अधिकची रजा देणे गरजेचे आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Last Updated : Sep 3, 2020, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.