चंद्रपूर - शेतातील सोयाबीन पिकाच्या ढिगाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्यानची घटना कोरपना तालुक्यातील विसापूर येथे उघडकीस आली आहे. रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी पिकाच्या ढिगाला आग लावली. या घटनेत शेतकऱ्याचे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष हरीश घोरे यांचे कोरपना तालुक्यातील विसापूर येथे शेत आहे. त्यांनी नुकतीच शेतातील सोयाबीन काढली होती. या सोयाबीन पिकाचा ढिग त्यांनी शेतात रचून ठेवला होता. सोमवारी घोरे हे शेतात गेले असता त्यांना सोयाबीनचा ढग जळून खाक झालेला दिसला. या आगीत अंदाजे दोन लाखांची सोयाबीन जळून खाक झाली आहे.