चंद्रपूर: लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti corruption Department) 50 लाखांची लाच घेतल्या प्रकरणी ( In case of taking bribe ) 3 मे च्या रात्री मृद व जलसंधारण अधिकारी कविजित पाटील (नागपूर), श्रावण शेंडे (ब्रह्मपुरी) व रोहित गौतम (चंद्रपूर) यांना अटक केली. न्यायालयाने लाचखोर अधिकाऱ्यांची 6 दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली. दरम्यान या गुन्ह्याचा सूक्ष्म तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनामिका मिर्झापुरे आणि टीम करत आहे. शुक्रवारी सायंकाळी मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आल्याने जलसंधारण विभागात खळबळ उडाली आहे.
लेखापालच्या घरी सापडले 4 लाख 90 हजार: एसीबीच्या 3 पथकाच्या संयुक्त कारवाईची चर्चा असतांना तिन्ही अधिकाऱ्यांनी 81 लाखांची मागणी कशी केली, कुणासाठी केली याचा शोध आता सुरू आहे. गुरुवारी या अधिकाऱ्यांच्या घरांची झडती घेतली असता रोहित गौतम यांच्या घरी 4 लाख 90 हजार रोख सापडली होती. तपासाचा भाग म्हणून जलसंधारण विभागाचे चंद्रपूर येथील कार्यालय सील केले तरी तपास चंद्रपुर, ब्रह्मपुरी व नागपूर भोवती फिरत आहे.
अशी होती टक्केवारी: कार्यकारी अभियंता कविजित पाटील यांनी टक्केवारी नुसार 19 लाख 22 हजार 536 रुपये, उपविभागीय जलसंधारण अधिकारी चंद्रपुर श्रावण शेंडेंनी 56 लाख रुपये तर विभागीय लेखाधिकारी रोहित गौतम यांनी 5.50 लाख रु मागितले होते. इतकी मोठी रकम हे अधिकारी स्वतः ठेवणार होते की त्याची वाटणी होणार होती ? कुणा कुणाला यातील हिस्सा जात होता ? याचा शोध घेण्यासाठी सद्या नागपूर, चंद्रपूर व ब्रम्हपुरी येथील जलसंधारण च्या कार्यालयातून कागदपत्रे गोळा केली जात आहेत, अशी माहिती सूत्राने दिली. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलीस निरीक्षक सचिन मत्ते, सारंग निराशे, प्रवीण लाकडे यांची तपास मोहीम सुरू आहे.
Two officers Arrested for Bribe : 50 लाखांची लाच स्वीकारताना चंद्रपुरातील दोन अधिकाऱ्यांना अटक