ETV Bharat / state

लग्न पत्रिकेतून दिला सामाजिक संदेश, चंद्रपुरातील तरुणाचा नाविन्यपूर्ण उपक्रम - चंद्रपूर जिल्हा बातमी

चिमूर विधानसभा मतदारसंघातील काँगेसचे समन्वयक डॉ. सतिश वारजुरकर यांचे स्वीय सहायक म्हणून काम करणारे लोकेश कावळे यांचे लग्न 16 एप्रिलला आहे. त्यासाठी त्यांनी छापलेल्या लग्न पत्रिकेची सर्वत्र चर्चा होत आहे. या पत्रिकेतून त्यांनी सामाजिक संदेश दिले आहेत.

Invitation Card
लोकेश कावडेची लग्न पत्रिका
author img

By

Published : Mar 11, 2020, 10:12 AM IST

Updated : Mar 11, 2020, 10:34 AM IST

चंद्रपूर - विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण असतो. हा सोहळा अविस्मरणीय ठरावा याकरिता लग्न सोहळ्यात काही तरी हटके करण्याचा अनेकजण प्रयत्न करत असतात. अनेकदा यासाठी भरपूर पैसा खर्च केला जातो. मात्र, अनाठायी खर्च टाळून सा‌माजिक संदेश देऊनही हटके विवाह सोहळा करता येवू शकते हे मुडझाच्या कावळे परिवाराने दाखवून दिले आहे. त्यांनी लग्न पत्रिकेतून विवध सामाजिक संदेश दिले आहेत.

हेही वाचा - चंद्रपुरात अंधारी नदी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

चिमूर विधानसभा मतदारसंघातील काँगेसचे समन्वयक डॉ. सतिश वारजुरकर यांचे स्वीय सहायक म्हणून काम करणारे लोकेश कावळे यांचे लग्न 16 एप्रिलला आहे. त्यासाठी त्यांनी छापलेल्या लग्न पत्रिकेची सर्वत्र चर्चा होत आहे. या पत्रिकेतून त्यांनी सामाजिक संदेश दिले आहेत. मुलगा-मुलगी समान, दोघेही उंचावतील देशाची मान, जाती-पातीचे बंध तोडा, भारत जोडा, जल है तो कल है, सारे शिकूया, पुढे जाऊया, नेत्रदान श्रेष्ठदान, रक्तदान श्रेष्ठदान असे सामाजिक संदेश लग्न पत्रिकेतून देण्यात आले आहेत.

Last Updated : Mar 11, 2020, 10:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.