ETV Bharat / state

Russia Ukraine Crisis : चंद्रपुरातील सहा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू - रशिया युक्रेन युद्ध

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध भडकले ( Russia Ukraine Crisis ) असताना चंद्रपुरातील सहा विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकले ( Students From Chandrapur Stuck In Ukraine ) आहेत. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकरने प्रयत्न सुरु केले आहेत.

चंद्रपुरातील सहा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू

author img

By

Published : Feb 26, 2022, 7:46 AM IST

चंद्रपूर : रशियाने युक्रेनवर हल्ला चढवल्याने ( Russia Attacked On Ukraine ) तिथे आता तणावाचे वातावरण निर्माण झाले ( Russia Ukraine Crisis ) आहे. तिथे भारतातुन शिक्षणासाठी गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा यात समावेश असून, त्यांच्यामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असे सहा विद्यार्थी तिथे अडकले असून, शासनाने त्यांच्याशी संपर्क केला ( Students From Chandrapur Stuck In Ukraine ) आहे. त्यांना परत भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

भाड्याच्या घरात वास्तव्याला

चंद्रपूर जिल्ह्यातील हर्षल बलवंत ठावरे हा विद्यार्थी युक्रेनमधील टारनोपोईल राज्यात एमबीबीएस व्दितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. ऐश्वर्या प्रफुल्ल खोब्रागडे ही पाच वर्षीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. नेहा शेख ही वैद्यकीय शिक्षणासाठी झापोरोझीया या शहरात आहे. तर आदिती अनंत सायरे, धिरज असीम बिश्वास व दिक्षराज अकेला हे वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन येथे आहेत. हे सर्व जण युक्रेन येथे भाड्याच्या घरात वास्तव्याला आहेत. या सर्वांशी संपर्क झाला असून, त्यांना इतर देशातून भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सर्व सहाही विद्यार्थी सुखरूप आहेत.अशातला शिक्षणासाठी युक्रेनमध्ये नेणाऱ्या कंत्राटदाराने भोजन व अन्य जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करून ठेवण्याचा निरोप विद्यार्थ्यांना दिला आहे. त्यानुसार त्यांनी सर्व वस्तूंची जमवाजमव करून ठेवली आहे. परंतु परिस्थिती आणखी चिघळत असल्याने आणि विमाने बंद असल्याने वसतिगृहातील सर्व विद्याथी भयभीत झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.