चंद्रपूर - जिल्ह्यातील नागरपठार (विजयगुडा) येथील सोमराज ईशरू सीडाम (वय.21) या तरुणाची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणातील सहा आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास जिवती पोलीस करत आहेत.
नारपठार येथील मृत सोमराज सीडाम, त्याचे इतर तीन मित्र आरोपीच्या शेतात सागाचे तोडलेली लाकडे आणण्यासाठी गेले होते. तेथे हजर असलेले संबाजी गायमुखे, अविनाश गायमुखे, माधव गायमुखे, साधव मोरे, हरिभाऊ डुकरे व विकास डुकरे यांनी सोमराज सीडाम याला लाथा बुक्यांनी, दगडाने मारले. यातच त्याचा मृत्यू झाला. सोबत असलेल्या साथीदारांचा पाठलाग करून आरोपींनी दगडफेक केली. लिंबाराव धुंदी कुमरे यांनी जिवती पोलीस ठाणे येथे तक्रार दिली.
तक्रारीवरून संभाजी गायमुखे, अविनाश गायमुखे, माधव गायमुखे, साधव मोरे, हरिभाऊ डुकरे व विकास डुकरे यांच्यावर कलम 302, 323, 336, 120(ब), 143, 147, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार विश्वास पुल्लरवार हे करत आहेत.