चिमूर (चंद्रपूर) - बहिणीला वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरून तिच्या भावाने शेततळ्यात बुडवून बहिणीच्या नवऱ्याला मारल्याचे उघड झाले आहे. चिमूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी रोशन सूर्यभान मेश्राम याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दीपक सरदार नैताम (वय ३० रा. बामणी, ता. उमरेड) असे मृताचे नाव आहे.
दीपक १५ तारखेपासून बेपत्ता असल्याने त्याची शोधाशोध सुरू होती. त्यानंतर कवडशी येथील अरुण नन्नावरे यांच्या शेतशिवाराच्या तळ्यात १८ सप्टेंबरला दीपकचा मृतदेह पाण्यात तरंगताना शेतमालकास दिसला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी चौकशी सुरू केली. यामध्ये बहिणीला त्रास देत असल्याने रोशन हा दीपकला जीवे मारण्याची धमकी देत होता, अशी माहिती पोलिसांना समजली. यावरून रोशनची कसून चौकशी केली असता त्याने भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात आपण त्याला शेततळ्यात बुडवून मारल्याचे कबूल केले.
हेही वाचा - चंद्रपूरमध्ये जनता कर्फ्युचा 'वंचित'कडून विरोध; सामान्य माणसाचा रोजगार हिरावण्याचा आरोप
चिमूर पोलिसांनी तक्रारदार सुनंदा विजय नैताम (बोथली ता. उमरेड) यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम ३०२ प्रमाणे रोशन मसराम विरोधात गुन्हा नोंदवून अटक केली.