ETV Bharat / state

पुरावे देऊनही भद्रावतीच्या वाळू तस्कराला प्रशासनाचा अभय; शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार - वाळू तस्करी चंद्रपूर

भद्रावती तालुक्यातील एका बड्या वाळूतस्कराच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या. त्याच्या वाहनांच्या तपशिलासह अनेक पुरावे देखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले, मात्र, महिना लोटूनही त्यावर कुठलीच ठोस कारवाई अद्याप झाली नाही. याविरोधात आता शिवसेनेने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे तक्रार केली आहे.

चंद्रपूर
चंद्रपूर
author img

By

Published : Jun 12, 2020, 6:18 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात सध्या नद्यांवरील वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. राजकीय पाठबळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी साटेलोटेकरून नैसर्गिक संपत्तीचे आणि शासनाच्या महसुलाचे अतोनात नुकसान सर्रासपणे केले जात आहे. मात्र, अशा बड्या तस्करांवर कुठलीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. भद्रावती तालुक्यातील एका बड्या वाळूतस्कराच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या. त्याच्या वाहनांच्या तपशिलासह अनेक पुरावे देखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले, मात्र, महिना लोटूनही त्यावर कुठलीच ठोस कारवाई अद्याप झाली नाही. याविरोधात आता शिवसेनेने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे तक्रार केली आहे.

भद्रावती आणि वरोरा तालुक्यातून शिरणा आणि वर्धा नदी वाहते. या नदीच्या किनाऱ्यावरील वाळूची सर्रासपणे तस्करी केली जात आहे. यासाठी जेसीबी, पोकलेन, हायवा यासारख्या मोठ्या वाहनांनी वाळूचा उपसा केला जातो. यातून नैसर्गिक संपत्ती आणि शासनाच्या महसुलाचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे. अशा वाळू तस्करांना राजकीय वरदहस्त असून शासकीय अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून हा अवैध व्यवसाय जोमात सुरू आहे. असाच एक मोठा वाळूतस्कर या परिसरात सक्रिय आहे. याबाबत काही जागरूक नागरिकांनी तक्रार केली असता थातूरमातूर कारवाई केली जाते. मात्र, वेकोलीच्या परिसरात अवैध वाळूचा मोठा साठा आहे, त्यावर कुठलीही कारवाई प्रशासन करीत नाही असा आरोप होत आहे.

तस्करी होत असल्याच्या वाहनांच्या तपशिलासह भद्रावती पोलीस ठाण्याला देऊनही त्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. याची तक्रार आता शिवसेनेच्या कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष बंडू हजारे यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे केली आहे. या वाळू तस्कराचे नाव आणि तपशिलाचा पाढा वाचणारे निवेदन शिष्टमंडळाने दिले आहे. त्यावर त्वरित कारवाई करीत शासनाचा बुडालेला महसूल वसूल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यावर कुठली कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शिष्टमंडळात हजारे यांच्यासह शहरप्रमुख कैलाश तेलतुंबडे, उपजिल्हाध्यक्ष त्यागी यांचा समावेश होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.