ETV Bharat / state

देशातील क्रमांक दोनचे तापमान चंद्रपुरात, तापमानवाढीमुळे जिल्ह्यात अघोषित संचारबंदी - तापमान

आज देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर म्हणून चंद्रपूर शहराची नोंद झाली.

चंद्रपूर शहर
author img

By

Published : Apr 28, 2019, 10:53 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर म्हणून चंद्रपूर शहराची नोंद झाली. हे तापमान ४७.२ डिग्री एवढे होते. या तापमान वाढीमुळे आज शहरात अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र दिसून आले.

चंद्रपूर शहर

हवामानात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य भारतात अचानक तापमानात वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक परिणाम विदर्भात आणि त्यातही चंद्रपुरात दिसून येत आहे. मागच्या ३ दिवसांच्या तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. हे अनुक्रमे ४५.६, ४६.५ आणि ४७.२ डिग्री असे आहे. याची पूर्वसूचना म्हणून काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने हाय अलर्ट घोषित केला होता. १९०१ च्या उन्हाळ्यानंतर २०१८ चा सर्वाधिक उष्ण उन्हाळा असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, २०१९ चा उन्हाळा हा उच्चांक मोडणार आहे, असे सांगण्यात आले आहे. तसे दिसूनही येत आहे.

आज नोंद केल्यानुसार मध्यप्रदेशच्या खारगोने या ठिकाणानंतर देशात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून अकोला आणि चंद्रपूर शहराची नोंद करण्यात आली आहे. शहरालगत एकूण ३० कोळसा खाणी, महाऔष्णिक वीज केंद्र आणि अनेक कारखाने आहेत. यामुळे आणखी तापमान वाढ होण्यास मदत होते.

Intro:चंद्रपूर : चंद्रपूर शहरात सध्या सूर्य आग ओकतोय. दिवसेंदिवस तापमानात झपाट्याने वाढ होत असून आज देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर म्हणून चंद्रपूर शहराची नोंद झाली आहे. हे तापमान 47.2 डिग्री एवढे आहे. इतके उष्ण वातावरण असताना आज शहरात अघोषित अशी संचारबंदी असल्याचे चित्र दिसून आले.

Body:हवामानात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य भारतात अचानक तापमानात वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक परिणाम विदर्भात आणि त्यातही चंद्रपुरात दिसून येत आहे. मागच्या तीन दिवसांच्या तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. हे अनुक्रमे 45.6, 46.5 आणि 47.2 डिग्री असे आहे. याची पूर्वसूचना म्हणून काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने हाय अलर्ट घोषित केला होता. सन 1901 च्या उन्हाळ्यानंतर 2018 चा सर्वाधीक उष्ण उन्हाळा असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, 2019 चा उन्हाळा हा उच्चांक मोडणार आहे, असे सांगण्यात आले आहे. तसे दिसूनही येत आहे. चंद्रपूर शहरालगत एकूण 30 कोळसा खाणी, महाऔष्णिक वीज केंद्र आणि अनेक कारखाने आहे यातून उत्सर्जित झालेले कण हे उष्णतेला वातावरनात मिसळण्यात अडथळा निर्माण करतात. त्यामुळे हे शहर लवकर थंड येत नाही. म्हणूनच सकाळी आठ वाजतापासून शहर तापायला लागतं तर रात्री 8 पर्यंत याची दाहकता जाणवत असते.

Conclusion:आज नोंद केल्यानुसार मध्यप्रदेशच्या खारगोने या ठिकाणानंतर देशात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून अकोला आणि चंद्रपूर शहराची नोंद करण्यात आली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.