ETV Bharat / state

जिल्हा बँक घोटाळा; फसवणूक झालेल्या खातेदारांच्या बँकेसमोर रांगा; शेकडो ग्राहकांना रोखपालाचा गंडा - चंद्रपूरात जिल्हा बँक घोटाळा

ग्राहकांनी खात्यात भरण्यासाठी दिलेले पैसे रोखपाल घाटे याने स्वतःच लंपास केले. मागील शुक्रवारी जेव्हा एका सोसायटीने मुख्यालयाकडे तक्रार केली. तेव्हा या घोटाळ्याचे बिंग फुटले. शनिवारपासून या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे. तक्रारींचा ओघ बघता हा घोटाळा मोठा असण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर
चंद्रपूर
author img

By

Published : Feb 15, 2021, 5:43 PM IST

चंद्रपूर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चंद्रपूर शहर शाखेत रोखपाल निखिल घाटे याने सुमारे दीड कोटींच्या रकमेची अफरातफर केल्याचे प्रकरण शनिवारी समोर आले. या प्रकरणामुळे बँकेच्या ग्राहकात मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बँक सुरू होताच अनेक ग्राहकांनी बँकेत धाव घेत आपले खाते तपासले. तेव्हा खात्यात पैसे टाकलेच नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. फसवल्या गेलेल्या अशा ग्राहकांची संख्या मोठी आहे. आता त्यांच्या तक्रारी घेतल्या जात आहेत. यासाठी बँकेत एक अधिकारी नियुक्त केला असून, तो या तक्रारी स्वीकारत आहे. तक्रारी देण्यासाठी मोठी रांग बँकेत लागली असून, यात वैयक्तिक आणि सहकारी सोसायट्यांच्या समावेश आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चंद्रपूर शहर शाखेत घोटाळा

ग्राहकांनी खात्यात भरण्यासाठी दिलेले पैसे रोखपाल घाटे याने स्वतःच लंपास केले. मागील शुक्रवारी जेव्हा एका सोसायटीने मुख्यालयाकडे तक्रार केली. तेव्हा या घोटाळ्याचे बिंग फुटले. शनिवारपासून या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे. तक्रारींचा ओघ बघता हा घोटाळा मोठा असण्याची शक्यता आहे.

आज अनेक ग्राहकांनी आपल्या खात्याची शहानिशा करण्यासाठी ब‌ँकेत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार दुपारी 12 वाजेपर्यंत घोटाळ्याचा आकडा 55 लाखांवर गेला होता. हा आकडा केवळ आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा आहे. ग्रामीण भागातून ग्राहक, सभासद शेतकरी, सहकारी सोसायट्या आणि ग्रामपंचायतीचे कारभारी तक्रारी घेऊन आले होते. या शाखेतील सुमारे 1700 ग्राहकांना बँकेने मोबाईलवरून मेसेज पाठवले असून, हे सगळे ग्राहक आल्यावर खरा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. पण या घोटाळ्याने सर्वसामान्य ग्राहक आणि शेतकरी मात्र पुरता हादरला आहे. आपले हक्काचे पैसे मिळणार की नाही, या चिंता त्यांना सतावत आहे.

बँकेकडून याप्रकरणी 420 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पण अजूनपर्यंत मुख्य आरोपी असलेला बँकेचा रोखपाल निखिल घाटे याला अटक झालेली नाही. बँकेकडून त्याचे निलंबनही झालेले नाही. त्यामुळे या घोटाळेबाजाला वाचवण्याचे प्रयत्न तर होत नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. बँकेने ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेसमोरील बँक शाखेत एक अधिकारी नियुक्त केला आहे. ग्राहकांना मोबाईलवर मेसेज पाठवले असल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोटे यांनी दिली. आरोपी रोखपाल घाटे याने अफरातफर केलेल्या पैशांचा वापर आयपीएलवरील सट्टा खेळण्यासाठी, ओळखीच्या लोकांना व्याजाने देण्यासाठी वापरल्याची माहिती पुढे येत आहे. पण एवढ्या मोठ्या रकमेची अफरातफर एक सामान्य कर्मचारी कुणाचे पाठबळ असल्याशिवाय कसा करू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.