ETV Bharat / state

लाच घेताना विस्तार अधिकाऱ्यासह सरपंच अन उपसरपंच अटकेत

author img

By

Published : Jul 23, 2020, 1:02 PM IST

निलंबित ग्रामसेवकाचे नाव चौकशीतून काढण्यासाठी लाच घेणाऱ्या विस्तार अधिकारी, सरपंच व उपसरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.

officer
officer

चिमूर (चंद्रपूर) - तालुक्यातील भीसी ग्रामपंचायत मधील कामात ई टेंडरिंगची प्रक्रिया योग्यरित्या न राबविल्याचा ठपका ठेऊन ग्रामसेवकाला निलंबीत करण्यात आले होते. या चौकशीतून नाव कमी करण्यासाठी ३० हजार रूपयांंची लाच मागितल्या प्रकरणी विस्तार अधिकारी, भिसीचे सरंपच व उप सरपंचाना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

दुकान गाळे बांधकामाची ई-टेंडरिंग प्रक्रिया योग्य न राबविल्याचा ठपका ठेवत तक्रारदाराला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी विस्तार अधिकारी हेमंत हुमणे (वय ५५ वर्षे)यांच्या मार्फत सुरू होती. या चौकशीतून नाव कमी करण्यासाठी हुमणे यांनी निलंबीत ग्रामसेवकाकडे ३० हजार रूपयांंची मागणी केली. तर सरपंच योगीता अरूण गोहणे (वय ३४ वर्षे), उपसरपंच लिलाधर प्रभाकर बन्सोड (वय ४५ वर्षे) यांनी प्रेरीत केले.

त्यानंतर तक्रारदाराने याबाबत चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

त्यानंतर पोलीस निरिक्षक नीलेश सुरडकर यांनी तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचला. बुधवारी(दि. २२ जुलै) विस्तार अधिकारी हेमंत हुमणे यांनी सरपंच, उपसरपंचाच्या समक्ष ३० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यावेळी तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी तिघांनविरोधात गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.