ETV Bharat / state

राष्ट्रीय युवा पुरस्काराने इको-प्रो संस्थेचा सन्मान, किरेन रिजिजूंनी केले पुरस्कृत - Eco-Pro organization

देशभरातील 20 तरूण आणि 3 संस्थांना आज हे पुरस्कार वितरीत करण्यात आले. कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील विनीत मालपुरे आणि चंद्रपूर येथील इको-प्रो संस्थेलाही या पुरस्काराने गौरविण्यात आले.

राष्ट्रीय युवा पुरस्काराने इको-प्रो संस्थेचा सन्मान, किरेन रिजिजूंनी केले पुरस्कृत
author img

By

Published : Aug 13, 2019, 9:48 AM IST

Updated : Aug 13, 2019, 12:29 PM IST

चंद्रपूर - इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेस आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-17 ने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त दिल्ली येथील अशोक हॉटेलमधे आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

राष्ट्रीय युवा पुरस्काराने इको-प्रो संस्थेचा सन्मान, किरेन रिजिजूंनी केले पुरस्कृत

यावेळी केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी, सह सचिव असित सिंह उपस्थित होते. देशभरातील 20 तरूण आणि 3 संस्थांना आज हे पुरस्कार वितरीत करण्यात आले. कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील विनीत मालपुरे आणि चंद्रपूर येथील इको-प्रो संस्थेलाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेने विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत या संस्थेला “राष्ट्रीय युवा पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी संस्थेचे नितिन रामटेके, रविंद्र गुरनुले उपस्थित होते. इको-प्रो संस्थेने पर्यावरण संरक्षण, जनजागृती, वन्यजीव रेस्क्यू, जनजागृती, पुर-परिस्थितित मदतकार्य, चंद्रपूर किल्ल्याची स्वच्छता करून संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या 'ब्लड ऑन कॉल' योजनेची प्रभावी अंमलबजावणी या संस्थेने केली आहे. पर्यावरण, वन्य-जीव संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, रक्तदान, जल संवर्धन जनजागृती, युवा क्षेत्रात आदी कार्य या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. सामाजिक जाणीवेतून दिलेल्या उत्तम सेवेची दखल राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

Intro:
चंद्रपूर: चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेस आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. Body:केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त येथील दिल्ली येथील अशोक हॉटेल मधे आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणा-या राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-17 चे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी, सह सचिव असित सिंह उपस्थित होते. देशभरातील 20 तरूण आणि 3 संस्थाना आज हे पुरस्कार वितरीत करण्यात आले असून कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर, नाशिक जिल्हयातील कळवण येथील विनीत मालपुरे आणि चंद्रपूर येथील इको-प्रो संस्थेलाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेने विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत या संस्थेला “राष्ट्रीय युवा पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी संस्थेचे नितिन रामटेके, रविंद्र गुरनुले उपस्थित होते. इको-प्रो संस्थेने पर्यावरण संरक्षण, जनजागृती, वन्यजीव रेस्क्यू, जनजागृती, पुर-परिस्थितित मदतकार्य, चंद्रपूर किल्ल्याची स्वच्छता करून संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या 'ब्लड ऑन कॉल' योजनेची प्रभावी अंमलबजावणी या संस्थेने केली आहे. पर्यावरण, वन्य-जीव संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, रक्तदान, जल संवर्धन जनजागृती, युवा क्षेत्रात आदी कार्य या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. सामाजिक जाणीवेतून दिलेल्या उत्तम सेवेची दखल राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.Conclusion:
Last Updated : Aug 13, 2019, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.