ETV Bharat / state

चंद्रपुरात 'मेरिट बचाव, राष्ट्र बचाव' रॅली; खुल्या वर्गासाठी ५० टक्के जागा कायम ठेवण्याची मागणी - collector kunal khemnar

'मेरिट बचाव, राष्ट्र बचाव' या नावाखाली हा मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या अतिरेकाने गुणवत्ता टिकविणे हे दुर्लभ झाले आहे. यामुळे सवर्ण वर्गातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

मोर्च्याचे छायाचित्र
author img

By

Published : Jul 21, 2019, 8:43 AM IST

चंद्रपूर - सध्याच्या सरकारने केवळ राजकीय मते डोळ्यासमोर ठेऊन अनेक समाजांना आरक्षण देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील जागा 22 टक्क्यांहून कमी झाल्या आहेत. यामुळे गुणवत्ता नष्ट होण्याच्या मार्गावर आली असून संविधानाप्रमाणे खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के जागा कायम ठेवण्यात यावी, अशी प्रमुख मागणी घेऊन शनिवारी चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला आहे.

मोर्च्या बद्दल माहीती देताना नागरिक

'मेरीट बचाव, राष्ट्र बचाव' या नावाखाली हा मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या अतिरेकाने गुणवत्ता टिकवणे हे दुर्लभ झाले आहे. यामुळे सवर्ण वर्गातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. भारतीय संविधानात जास्तीत-जास्त ५० टक्के आरक्षण देण्याचे सांगितले आहे. मात्र, केंद्र सरकार आणि प्रामुख्याने राज्य शासन हे राजकीय लोभापायी संविधानाच्या उद्देशाला हरताळ फासत आहे. मतांवर डोळा ठेऊन हा सर्व राजकीय डाव आखण्यात येत आहे. मागास प्रवर्गासाठी ५० टक्के आरक्षण कायम ठेवावे. मात्र, त्याची अतिरिक्त मर्यादा वाढवून गुणवत्तेला मारक अशी स्थिती निर्माण करू नये, असे मत मोर्चाच्या आयोजकांचे आहे.

गांधी चौकातून संध्याकाळी ४ वाजता हा मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले असता मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या सदस्यांनी सभेला संबोधित केले. यानंतर आपल्या मांगण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना सादर करण्यात आले.

Intro:चंद्रपुर : सध्याच्या सरकारने केवळ राजकीय मते डोळ्यासमोर ठेऊन अनेक समाजांना आरक्षण देण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे खुल्या प्रवर्गातील जागा ह्या 22 टक्क्यांहून कमी झाल्या आहेत. यामुळे गुणवत्ता नष्ट होण्याच्या मार्गावर आली असून संविधानाप्रमाणे खुल्या प्रवर्गासाठी 50 टक्के जागा कायम ठेवण्यात याव्या अशी प्रमुख मागणी घेऊन आज चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला.

Body:' सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' या नावाखाली हा मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या अतिरेकाने गुणवत्ता टिकविणे हे दुर्लभ झाले आहे. यामुळे सवर्ण वर्गातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. भारतीय संविधानात जास्तीतजास्त 50 टक्के आरक्षण देण्याचे सांगितले आहे. मात्र, केंद्र सरकार आणि प्रामुख्याने राज्य शासन हे राजकीय लोभापायी संविधानाच्या उद्देशाला हरताळ फासत आहे. मतांवर डोळा ठेऊन हा सर्व राजकीय डाव आखण्यात येत आहे. मागास प्रवर्गासाठी 50 टक्के आरक्षण कायम ठेवावे मात्र त्याची अतिरिक्त मर्यादा वाढवून गुणवत्तेला मारक अशी स्थिती निर्माण करू नये असे मत यावेळी मोर्चाच्या आयोजकांचे आहे. गांधी चौक येथून संध्याकाळी 4 वाजता हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले असता या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या सदस्यांनी सभेला संबोधित केले. यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना सादर करण्यात आले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.