ETV Bharat / state

चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात पडला फेसमिश्रीत पाऊस; कारण अद्याप अस्पष्ट

author img

By

Published : Sep 22, 2021, 10:37 AM IST

Updated : Sep 22, 2021, 11:41 AM IST

चंद्रपुरात मंगळवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसानंतर हाऔष्णिक वीज केंद्राच्या सुमारे दीड ते दोन किलोमीटर परिसरात फेस साठल्याचे दृश्य दिसून आले. ज्या भागात फेस पडला, त्या भागात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि अनेक कोळसा खाणी असल्याने या खाणीतून निघणाऱ्या वायू प्रदूषणामुळे पावसाच्या पाण्यावर रासयनिक प्रक्रिया होऊन अशा प्रकारे फेस निर्माण झाला असावा असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

फेसमिश्रीत पाऊस
फेसमिश्रीत पाऊस

चंद्रपूर - चंद्रपुरात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसाच्या पाण्याला फेस येत असल्याचे वेगळेच चित्र यावेळी पहायला मिळाले. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर कोळसा खाण परिसरात हा प्रकार दिसून आला. मात्र याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. झाडांवर-गवतावर-रस्त्यावर अनेक ठिकाणी हा पुंजक्याच्या स्वरूपातील फेस नजरेस पडला आहे. काही भागात तर या फेसाचे पुंजके बघायला मिळाला. त्यामुळे परिसरात हा पाऊस कुतुहलाचा विषय झाला आहे.

चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात पडला फेसमिश्रीत पाऊस

रासयानिक प्रक्रियेमुळे फेसनिर्मितीची शक्यता पर्यावरण विभागाने फेटाळली-

चंद्रपुरात मंगळवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसानंतर हाऔष्णिक वीज केंद्राच्या सुमारे दीड ते दोन किलोमीटर परिसरात फेस साठल्याचे दृश्य दिसून आले. ज्या भागात फेस पडला, त्या भागात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि अनेक कोळसा खाणी असल्याने या खाणीतून निघणाऱ्या वायू प्रदूषणामुळे पावसाच्या पाण्यावर रासयनिक प्रक्रिया होऊन अशा प्रकारे फेस निर्माण झाला असावा असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. या संदर्भात पर्यावरण अभ्यासकांनी चंद्रपूरचे प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात जाऊन विचारणा केली. त्यावेळी प्रदुषण कार्यालयाने दिलेल्या माहितीही धक्कादायक खुलासा झाला आहे की हा फेस निर्मितीचा प्रकार रासायनिक पृथ:क्करणातून झाला नाही. त्यामुळे या फेसयुक्त पावसाबद्दल अधिकच कुतूहल निर्माण झाले आहे.

चंद्रपूर शहर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर आहे. या शहरात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय कार्यालय आहे. मात्र या कार्यालयात अशी कुठलीही व्यवस्था नसणे, हे धक्कादायक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. आम्लवर्षा चंद्रपूरसाठी नवी नाही. याआधीही चंद्रपुरात तुरळक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. मात्र फेसयुक्त पुंजके थेट पावसासोबत जमिनीच्या पृष्ठभागावर पडल्याने हा नक्की काय प्रकार आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक योगेश्वर दुधपचारे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -भारतात नोव्हेंबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता - डॉ. अविनाश भोंडवे

हेही वाचा - सिन्नरच्या दूध संकलन केंद्रात दुधामध्ये सोयाबीन तेल आणि रंगहीन द्रव्याची भेसळ; पाच जणांवर गुन्हा दाखल

Last Updated : Sep 22, 2021, 11:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.