चंद्रपूर - धावत्या रेल्वेचे २२ डबे मागे सोडून केवळ तीन डब्यांसह इंजिन पुढे गेल्याचा प्रकार वरोरा तालुक्यातील माजरी रेल्वे स्थानकाजवळ घडला. दोन डब्यांना जोडणारा जॉईंट तुटल्याने हा प्रकार घडला आहे. केवळ ३ डबेच घेऊन संघमित्रा एक्सप्रेस पुढे गेली.
पाटणा-बंगळुर रेल्वे क्रमांक 12296 ही संघमित्रा एक्सप्रेस संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी नागपूर येथून बल्लारपूरकडे निघाली होती. रात्री साडेआठच्या सुमारास या एक्सप्रेसचे 22 प्रवासी डब्बे सुटले. दोन डब्यांना जोडणारा जॉईंट तुटल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे इंजिन मागील तीन डब्बे घेऊन पुढे गेले. हा प्रकार समजल्यानंतर प्रवासी भयभीत झाले होते.