चंद्रपूर - गरिबांच्या घरासमोर कधी चौकीदार पाहिला का? मोदींनी फक्त श्रीमंत लोकांची चौकीदारी केली, असा घणाघात चंद्रपुरात राहुल गांधींनी मोदींवर केला. २०१४ मध्ये मला चौकीदार करा म्हणणाऱ्या मोदींनी पाच वर्षे देशातील श्रीमंताची चौकीदारी केली. अंबानी, अदानींनी देशाल लुटले आणि देशाचा पंतप्रधान त्यांची चौकीदारी करत होता, असे ते यावेळी म्हणाले.
प्रत्येकाला १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन मोदींनी केले होते मात्र ते देऊ शक्य नाहीत. मात्र, आम्ही आमचे सरकार आले तर गरिबांना ७२ हजार नक्की देऊ. नरेंद्र मोदी उद्योगपतींना लाखो कोट्यवधी रूपयांचे कर्ज देतात मात्र त्याच्यांकडे शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी पैसे नाहीत. त्यांना शेतकऱ्यांपेक्षा उद्योगपतींबद्दल जास्त लळा आहे. आधी अच्छे दिनचा नारा होता, या निवडणुकीच्या वेळी चौकीदार चोर है हा नारा आहे. यातूनच मोदींना लोक किती वैतागले आहेत हे दिसून येते असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी चौकीदार चोर है या घोषणाही देण्यात आल्या.
राफेलची किंमत युपीएच्या काळात ५२६ कोटी रूपये होती. ती वाढून १६०० कोटी रुपये करण्यात आली. या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार करण्यात आला. राफेल निर्मितीचे अनिल अंबानींना काम देण्यात आले. मात्र, त्यांनी कधी कागदाचे विमानही बनवले नाही. यातून अनिल अंबानींचा ३० हजार कोटींचा फायदा करून दिला असेही राहुल गांधी म्हटले.
काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी आहे आहेत. मागील काही दिवसांपासून राहुल गांधी हे आक्रमक पवित्र्यात दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ते थेट टीकास्त्र सोडत आहेत. आमची सत्ता आली तर सर्वप्रथम आम्ही राफेलची चौकशी करू, गरिबांना वर्षाचे ७२ हजार रुपये देऊ, चौकीदाराला जेलमध्ये टाकू अशा घोषणा राहुल यांनी नागपुरात केल्या आहेत. त्यामुळे आजच्या सभेत राहुल गांधी कुठले मुद्दे उपस्थित करतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.