ETV Bharat / state

Protest Against Padalkar : पडळकरांविरोधात अजित पवार गट आक्रमक; पडळकरांच्या प्रतिमेला मारले जोडे - पडळकरांविरोधात अजित पवार गट आक्रमक

Protest Against Padalkar : भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून राज्यात गोपीचंद पडळकरांविराधात आंदोलन करण्यात येत आहेत. चंद्रपुरातही पडळकरांच्या वक्तव्याचा त्यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध करण्यात आला.

Protest Against Padalkar
Protest Against Padalkar
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 12:37 PM IST

चंद्रपूर Protest Against Padalkar : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी एक आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांच्या विधानाचा अजित पवार गटाकडून राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. चंद्रपुरातही पडळकरांविरोधात अजित पवार गटाच्या समर्थकांनी आक्रमक होत तीव्र आंदोलन केलं. यावेळी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. (Gopichand Padalkar vs Ajit Pawar)

पडळकरांचे वक्तव्य चुकीचे : आरक्षणासंदर्भात भाजपानेते गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन दिलं होतं. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन न दिल्याने त्यांना याबाबत विचारले असता अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून मानतच नाही म्हणत पडळकरांनी पुढे काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर तीव्र आक्षेप घेत पडळकरांना प्रत्युत्तर दिलं होतं. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांवर त्वरित कारवाई करावी असा इशाराही त्यांनी दिला होता. पडळकरांच्या विधानामुळे त्यांच्यावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली. अजित पवार गटातूनही याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असल्याने भाजपाच्या नेत्यांनी देखील पडळकरांची कानउघाडणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही पडळकरांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगून अशा पद्धतीचं वक्तव्य टाळण्याचा सल्ला त्यांना दिला. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही वैयक्तिक टीका कुणावरही करू नये असा सल्ला पडळकरांना दिला होता. मात्र, राष्ट्रवादीचा अजित पवार गट यावर आक्रमक झाला असून सुनील तटकरेंनी पडळकरांवर कारवाई करण्यासंदर्भात मागणी करणार असल्याचं सांगितलं. पडळकरांच्या त्या वक्तव्याचा अजित पवार गटाकडून संपूर्ण राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

पडळकरांचे मानसिक संतुलन ढासळले : चंद्रपूर जिल्ह्यात अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पडळकर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलंय. पडळकरांचं मानसिक संतुलन ढासळलं असून यापूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांचा धक्कादायक पराभव झाला आणि डिपॉझिट देखील जप्त झालं होतं. या धक्क्यातून पडळकर अजूनही सावरलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मानसिक उपचाराचा सर्व खर्च राष्ट्रवादी करेल असं म्हणत पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा :

  1. Gopichand Padalkar On Love Jihad: पुण्यातील दोन प्रकरणांमध्ये लव्ह जिहाद...गोपीचंद पडळकर यांचा दावा, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
  2. Sharad Pawar News: पवारांच्या एकेरी उल्लेखानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; भाजपच्या नेत्यांचे कुत्रीच्या तोंडावर लावले फोटो
  3. Graduate Constituency Election : पदवीधर मतदार संघ निवडणूक; मतदान व परिक्षा एकाच दिवशी, पडळकरांचे निवडणूक आयोगाला पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.