ETV Bharat / state

Women Son Died In Accident : ट्रकच्या भीषण अपघातात गर्भवती महिलेसह तीन वर्षीय मुलाचा मृत्यू

दुचाकीवरून जात असताना ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत गर्भवती महिलेसह तीन वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू ( pregnent women and son died ) झाला. या अपघातात अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली पोलीस ठाण्याचा हद्दीत खुटाळा गावाजवळ घडली.

accident
accident
author img

By

Published : Jul 2, 2022, 10:53 PM IST

चंद्रपूर - दवाखान्यात तपासणी करण्यासाठी 27 वर्षीय राखी निखिल ठावरी ही गर्भवती महिला आपल्या पतीसोबत दुचाकीवरून निघाली होती. त्यांच्यासोबत पाच वर्षीय मुलगी कनक ठावरी व तीन वर्षीय लक्ष असे हे चारजण दुचाकीवरून (क्रमांक MH 34 BQ 2057) पडोलीकडे जात होते. त्यावेळी घुग्घुस वरून पडोलीकडे येणाऱ्या ट्रकने (क्रमांक MH 40 BL 5827) ठावरी यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक ( Truck Two wheeler Accident ) दिली. धडक इतकी जोरदार होती की यात तीन वर्षीय लक्ष्य व गर्भवती नम्रता जागीच ठार ( pregnent women and son died ) झाले.

दोघे जखमी - ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील चौघेही खाली पडले. यात नम्रता आणि तीन वर्षांचा मुलगा लक्ष्य हे जागीच ठार झाले. तर पती निखिल ठावरी व पाच वर्षीय कन्या कनक हे दोघे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले. हे सर्व लहुजी नगरचे राहणारे आहेत. अपघातानंतर घटना घडली त्या खुटाळा गावातील नागरिक संतप्त झाले होते. ट्रक चालकाला पडोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर भादवि कलम 279, 337, 304 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

एक महिन्याआधी नागरीकांनी केली होती तक्रार - पडोली मार्गवर नेहमी अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यातही महामार्गावर अवैधरित्या वाहने उभी केली जातात. ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो आणि वारंवार छोटेमोठे अपघात होत असतात. यामुळे खुटाळा गावातील नागरिकांनी एक महिना आधीच ग्रामपंचायतीला निवेदन देत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र ग्रामपंचायतीने याचा पाठपुरावा केला नाही. अखेर आज एक महिन्यानंतर दोन निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला. पोलीस विभागाने जिल्ह्यात सर्वाधिक अशा अवैधरित्या उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्याचा दावा पडोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी केला आहे.

हेही वाचा - Amravati Chemist Murder : उमेश कोल्हे प्रकरणाची गृहमंत्रालयाकडून दखल; तपास एनआयएकडे वर्ग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.