चंद्रपूर - जिल्ह्यातील भद्रावती तेलवासा येथील सुमठाना शेतशिवारात ४ एप्रिलला एका २२ वर्षीय तरुणीचे शीर नसलेले धड नग्नावस्थेत आढळून ( Young Girl Naked Dead Body Found ) आल्याने खळबळ उडाली. या तरूणीची अद्यापही कुठलीही ओळख पटलेली नाही. हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला शोधण्यात पोलीस यंत्रणेला यश आले नाही. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली ( Pratibha Dhanorkar Demand HM Walase Patil ) आहे.
चंद्रपूर जिल्हा हा शांत कायदा व सुव्यवस्था अबाधित असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु, जिल्ह्यातील भद्रावती तेलवासा येथे एक युवतीचे धडापासून डोके वेगळे केल्याची गंभीर घटना घडली आहे. ही घटना या जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारी आहे. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला दोन दिवस लोटून देखील नराधम आरोपीला अटक व त्या युवतीची ओळख पटविण्यात अपयश आले आहे. ही बाब गंभीर आहे.
या गंभीर गुन्ह्यात या युवतीची त्वरित ओळख पटणे आवश्यक आहे. तर, खऱ्या आरोपीला पकडता येणे शक्य आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.