ETV Bharat / state

Political crisis in Maharashtra : चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार शिंदे गटात सामील झाल्याने पून्हा ट्रोल - Government of Maharashtra will collapse

आमदार किशोर जोरगेवार ( MLA Kishor Jorgewar ) यांनी पुन्हा एकदा अतिउत्साही निर्णय घेतला आहे. शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे (Rebellion Eknath Shinde ) जवळपास 45 आमदाराना घेऊन वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत आहे. सध्या सर्व आमदार गुवाहाटी येथे आहेत. ते काय भूमीका घेणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

Independent MLA Kishor Jorgewar
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार
author img

By

Published : Jun 24, 2022, 7:16 PM IST

चंद्रपूर - आमदार किशोर जोरगेवार ( MLA Kishor Jorgewar ) यांनी पुन्हा एकदा अतिउत्साही निर्णय घेतला आहे. शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे (Rebellion Eknath Shinde ) जवळपास 45 आमदाराना घेऊन वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत आहे. सध्या सर्व आमदार गुवाहाटी येथे आहेत. ते काय भूमीका घेणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. असाच निर्णय चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार ( Independent MLA Kishor Jorgewar ) यांच्या अंगलट आला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ( Assembly election results ) लागताच त्यांनी माजी मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis as former Chief Minister ) यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता.

भाजप तसेच काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी जोरगेवार यांना प्रचंड बहुमत मिळाले होते. त्यामुळे जनतेला न विचारता त्यांनी भाजपला पाठिंबा देत जनतेची नाराजी ओढवून घेतली. त्यातही राजकीय समीकरणे बदलल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले. त्यामुळे जोरगेवार यांची चांगलीच गोची झाली. सोशल मीडियावर जनतेचा रोष दिसून आला. जोरगेवार यांचे हे नुकसान अजूनही पूर्णपणे भरून निघू शकले नाही. अशातच त्यांनी शिवसेनेत बंड पुकारणारे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. चंद्रपूरकरांसाठी हा अनपेक्षित धक्का आहे. विशेष म्हणजे राजकीय समीकरण स्पष्ट होण्यापूर्वीच आमदार जोरगेवार यांनी ही भूमिका घेतल्याने ते पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागलेले आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या पथ्यावर पडतो की, अंगलट येतो हा येणारा काळच ठरविणार आहे. मात्र सध्या त्यांच्या या भूमिकेवर टिकेचा भडीमार होत आहे.

आणि जोरगेवारांनी इतिहास घडवला -
किशोर जोरगेवार यांनी अनेक पक्षांची वारी केली आहे. सुरुवातीला ते भाजपचे कार्यकर्ते होते, तसेच सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय होते. 2014 मध्ये त्यांना चंद्रपूर विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश मिळवीला. भाजप-सेनेची युती न झाल्याने चंद्रपूरातून सेनेकडून जोरगेवार यांनी निवडणूक लढविली मात्र ते पराभूत झाले. यानंतर त्यांनी शिवसेना सोडत 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यंग चांदा ब्रिगेड या संघटनेची स्थापना केली. या दरम्यान काँग्रेसकडून तिकीट मिळावे यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांना अपक्ष लढण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला. याचा सर्वाधिक फायदा त्यांना झाला.

विजयावर जोरगेवारांचे विरजण -
मात्र, या विजयोत्सवाच्या दुधात मिठाचा खडा जोरगेवार यांच्याच कडून टाकण्यात आला. राजकीय समीकरण स्पष्ट होण्यापूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत मुख्यमंत्री म्हणुन पाठिंबा जाहीर केला. यावेळी जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया उमाटू लागल्या. कारण भाजप पक्षाला मतदान न करणाऱ्या वर्गाने मोठ्या संख्येने जोरगेवार यांना मतदान केले होते. फडणवीसच मुख्यमंत्री बनणार हा अतिआत्मविश्वास जोरगेवार यांच्या अंगलट आला. शेवटी महाविकास आघारडीची सत्ता आली. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीला समर्थन जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेमुळे जोरगेवार चांगलेच ट्रोल झाले.

पुन्हा एकदा घेतली रिस्क - जोरगेवार यांनी पुन्हा एकदा अतिउत्साही निर्णय घेतला आहे. शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे जवळपास 45 आमदाराना घेऊन वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत भाजपसोबत युती करण्याची भूमिका त्यांनी घेतली. ते सध्या गुवाहाटी येथे आहे. मात्र पुढे काय होणार याची काहीही शाश्वती नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाही. सेनेचे बंडाखोर आमदार महाराष्ट्रात आल्यावर कुठली भूमिका घेतात हे स्पष्ट नाही. या राजकीय स्थितीमुळे अनेक राजकीय अभ्यासक आणि विश्लेषक देखील बुचकाळ्यात पडले आहेत. असे असताना जोरगेवार यांनी गुवाहाटी गाठत आपले समर्थन दिले. त्यांच्या या अनाकलनीय भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

200 युनिटचा मुद्दा पुन्हा गळ्यात अडकला - जोरगेवार यांनी आमदार होण्यापूर्वी एक मोहीम आक्रमकपणे राबविली होती. चंद्रपूर जिल्हा हा सर्वाधिक वीज उत्पादन करणारा जिल्हा असून येथील नागरिकांना 200 युनिट वीज मोफत देण्याची मागणी त्यांनी रेटून धरली होती. याला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, हाच प्रतिसाद जोरगेवार यांच्या अंगलट आला. आमदार होताच याच मुद्यावर ते ट्रोल होऊ लागले. आता त्यांनी कुठलेही आंदोलन किंवा प्रसिद्धीपत्रक काढले तर ते 200 युनिटवरच ट्रोल होतात. आता त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याने पुन्हा सोशल मीडियावर 200 युनिटच्या मुद्यावर जोरगेवार ट्रोल होताना दिसत आहे. जोरगेवार यांची ही भूमिका लाभदायक ठरते की तापदायक हे चित्र येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा - Narhari Zirwal Not Reachable :...अन् आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ झाले नॉट रिचेबल

हेही वाचा - Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या पलायनाची माहिती अंगरक्षकांकडून कंट्रोल रूमला, दिलीप वळसे पाटलांवर टांगती तलवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.