ETV Bharat / state

कोरोनाचा धसका; दारू काढताना तस्कारांनी ठेवले 'सोशल डिस्टन्स', छापा मारताना पोलीस चक्रावले

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दारू तस्करही सोशल डिस्टन्स पाळत आहेत. तस्करांचे सोशल डिस्टन्स पाहून पोलीसही चक्रावले आहेत. दरम्यान या घटनेची मोठी चर्चा परिसरात होत आहे.

Chandrapur
घरातच सुरू आहे दारूभट्टी
author img

By

Published : Apr 15, 2020, 10:03 AM IST

चंद्रपूर - देशभर संचारबंदी सुरू असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी गावठी दारू काढणाऱ्यांनी घरातच भट्टी लावल्याचे उघड झाले आहे. मात्र दारू काढताना त्यांनी सोशल डिस्टन्स ठेवले होते. दारू तस्करांनी पाळलेली खबरदारी बघून पोलीसही चक्रावले. दरम्यान पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात साठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील धाबा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या उंदीरगाव येथे घडली.

कोरोनाचा धसका; दारू काढताना तस्कारांनी ठेवले सोशल डिस्टन्स, छापा मारताना पोलीस चक्रावले
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घरात राहण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. दुसरीकडे संचारबंदीचा फायदा उचलण्यासाठी अवैध व्यावसायिकांनी पाय पसरायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावठी दारू काढणारे सक्रिय झाले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा पोलीस ठण्याअंतर्गत येणाऱ्या उंदिरगाव येथे चक्क घरातच दारूभट्टी लावण्यात आली. खबऱ्याच्या माहितीवरुन धाबा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशिल धोकटे यांनी पथकातील मनोहर मत्ते, विवेक गुडपल्ले, हिमांशू टापरे या सहकाऱ्यांसह भट्टीवर छापा मारला. तस्करांनी दारू काढताना सोशल डिस्टन्स ठेवल्याचे यावेळी पोलिसांना दिसून आले. तस्करांनी बाळगलेली खबरदारी बघून पोलीसही चक्रावले. पोलिसांनी दुर्योधन वनकर, संदिप वाकूडकर, हनुमंत वाकूडकर, भास्कर उंबरकर, जानकिराम वाकूडकर या पाच आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी 63 हजाराचा ऐवज जप्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.