ETV Bharat / state

चोरबीटी बियाण्यांची चोरपावलांनी तस्करी; मूल पोलिसांनी जप्त केले २५ लाखांचे बियाणे - Gondpimpari road

गोंडपिपरीवरून खेडी मार्गाने एका वाहनामधून अनधिकृत बियाण्यांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस दूरक्षेत्र बेंबाळच्या पथकाला मिळाली.रात्री १२ ते १ वाजेदरम्यान गोंडपिपरीवरून खेडीकडे जाणाऱ्या ट्रकची तपासणी केली असता साडेतीन हजार चोरबीटी बियाण्यांच्या बॅग आढळून आल्या.

police seized prohibited cotton seed of rupees twenty five lakhs
चोरबीटी बियाण्यांची चोरपावलांनी तस्करी; मूल पोलिसांनी जप्त केले २५ लाखांचे बियाणे
author img

By

Published : May 6, 2020, 9:26 AM IST

चंद्रपूर- राज्यात चोरबीटी बियाण्यांवर बंदी असताना याची छुप्या पद्धतीने तस्करी केली जात आहे. मूल पोलिसांनी यावर कारवाई करून तब्बल २५ लाख रुपये किमतीचे बीटी बियाणे जप्त केले. गोंडपिपरी-खेडी मार्गावर ही कारवाई करण्यात आली.

लॉकडाऊनमध्ये परवानगीविना वाहतूक करणे गुन्हा असल्याने पोलीस प्रशासन वाहतुकीवर लक्ष ठेवून आहे. गोंडपिपरीवरून खेडी मार्गाने एका वाहनामधून अनधिकृत बियाण्यांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस दूरक्षेत्र बेंबाळच्या पथकाला मिळाली. प्रमुख साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल तानू रायपुरे, प्रकाश हुलके, आनंदराव तितरमारे, देवीदास वेलादी आणि उज्ज्वल साखरकर यांनी २ मे रोजी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. रात्री १२ ते १ वाजेदरम्यान गोंडपिपरीवरून खेडीकडे जाणाऱ्या ट्रकची तपासणी केली असता साडेतीन हजार चोरबीटी बियाण्यांच्या बॅग आढळून आल्या.

पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले आणि ट्रक आणि बीटी बियाणे जप्त केले. मूल येथील तालुका कृषी अधिकारी यांना प्रशांत कासराळे यांनी बियाण्यांची तपासणी केली असता सदर बियाणे हे बीआर बीटी कंपनीचे असल्याचे आढळले. या बियाण्यांची विक्री आणि वापरावर राज्यात बंदी असतानाही काही कृषी केंद्रचालक मोठ्या संख्येने या बियाण्यांची विक्री करतात. या प्रकरणात तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध पर्यावरण संरक्षणअधिनियम, बी-बियाणे कायदा आणि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ट्रक (एमएच-३१-एक्यू-९८८२) जप्त करण्यात आला असून ट्रकचालक व मालक अब्दुल रशीद रऊफ शेख (३२, रा. नागपूर) याला अटक करण्यात आली आहे.

का आहे चोरबीटीची मागणी

राज्यात चोरबीटी बियाण्यांवर बंदी असताना अनेक शेतकरी याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. कारण हे बियाणे लावल्यावर रोपट्यांच्या आजूबाजूला जे तण उगवते त्यावर फवारणी केली असता कापसाचे झाड मरत नाही मात्र तण पूर्ण नष्ट होते. याऐवजी दुसरे बियाणे वापरल्यास तणनाशक फवारणी केली असता कापसाचे झाड देखील मरते. अशावेळी तण कापण्यासाठी मजुरांना लावावे लागते. यात शेतकऱ्याला अधिक खर्च लागतो. हे टाळण्यासाठी अनेक शेतकरी छुप्या पद्धतीने चोरबीटीचा वापर करतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.