चिमूर (चंद्रपूर) - चिमूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एक पोलीस कर्मचारी आपल्या पत्नी व मुलीसह यवतमाळ येथे लग्नाला जाऊन आले होते. त्यानंतर 25 जुलैला पती-पत्नीची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्या दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या तालुक्तातील बाधितांचा आकडा 9 वर पोहोचला आहे.
चिमूर तालुक्यात सोनेगाव वन येथील युवकाच्या रुपाने कोरोनाने एन्ट्री केली होती. त्यानंतर नेरी येथील एक, महादवाडी येथील 3 व शहरातीतील 25 वर्षीय युवती कोरोना बाधीत आढळली. त्यानंतर रविवारी रात्री उशीर पोलीस कर्मचारी व त्यांच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच इंदिरा नगर येथील 28 वर्षीय महिला धामनगाव रेल्वे येथे तिच्या बहिणीला भेटण्यास गेली होती. तिचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकुण बाधितांचा आकडा 9 वर पोहोचला आहे.
सध्या नव्या बाधितांच्या संपर्कात येण्याऱ्या व्यक्तींचा शोध सुरू असून त्यांचेही स्वॅब तपासणीला पाठविण्यात येणार असल्याची माहिती उप जिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. गो.वा. भगत यांनी दिली.