चंद्रपूर - तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेले हजारो मजूर पोडसा सीमेवर धडकले. एकाचवेळी हजारो मजूरांना सांभाळण्यासोबतच शांतता, सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी लाठी पोलीसांनी पार पाडली. लाठीचे ठाणेदार प्रदिपकूमार राठोड यांच्या प्रभावी नियोजनामुळे मजूर आपापल्या गावी परतले. त्यांच्या या कार्याची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली. चंद्रपूर जिल्हाच्या दौऱ्यावर असतांना गृहमंत्र्यांचा हस्ते राठोड यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर देश टाळेबंद करण्यात आला. तेव्हा तेलंगणात मिरची तोडण्याचा कामाला गेलेले हजारो मजूर तिथेच अडकून पडले. यानंतर केंद्र शासनाच्या आदेशानंतर त्यांना परत आणण्याची प्रक्रिया सुरु झाली. तेलंगणातील खम्मंग जिल्ह्यातून चार ते पाच दिवसात तब्बल तीस हजार मजूर पोडसा येथे आले. एकाच वेळी मोठ्या संख्येने मजूर आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. या काळात लाठीचे ठाणेदार प्रदीपकुमार राठोड यांनी प्रभावी नियोजन केले.
मजूरांना वाहनाने नेण्याची व्यवस्था पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे यांनी केली. तर पोडसाचे उपसरपंच देविदास सातपुते मजूरांचा मदतीला धावून गेले होते. या काळात ठाणेदार राठोड यांनी प्रभावी कामगीरी बजावली. सतत आठ दिवस कर्तव्यापलीकडे जावून ठाणेदार राठोड यांनी सामाजिक दायित्व जोपासले. त्यांच्या या कार्याची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा सन्मान केला.
कोरोनाचा संकटकाळात आपली कर्तव्ये अन् जबाबदारी वाढली होती. या काळात मजूरांची अवस्था बघून मन अस्वस्थ झाले. त्यांना दिलासा देणे आणि शांतता, सूव्यवस्था राखणे या दोन्ही बाबींवर भर दिला असल्याचे, प्रदिपकूमार राठोड यांनी सांगितले.
हेही वाचा - ऐकावं ते नवलंच! चक्क कुत्रा हाकतो बैलगाडी; मालकाला चालावं लागत मागे
हेही वाचा - लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र-तेलंगणाचा प्रेमबंधात कोरोनाने टाकला मिठाचा खडा