ETV Bharat / state

Passenger Vehicle Burnt : प्रवासी वाहनाला अचानक आग, सुदैवाने जीवितहानी नाही

उभ्या असलेल्या चारचाकी प्रवासी वाहनाला अचानक आग लागल्याने वाहन जळून खाक झाले ( Passenger Vehicle Burnt ) आहे. यात प्रवासी नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. पण, वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना मुल येथील जुन्या रेल्वे लाइनजवळील नगर परिषदेच्या ( Chandrapur Nagar Parishad ) संकल्पित बागेसमोर शुक्रवारी (दि. 28 जानेवारी) सायंकाळी घडली.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jan 29, 2022, 12:30 PM IST

चंद्रपूर - एका उभ्या असलेल्या चारचाकी प्रवासी वाहनाने अचानक पेट घेतल्याने वाहन जळून खाक झाले ( Passenger Vehicle Burnt ) आहे. यात प्रवासी नसल्याने जीवित हानी झाली नाही. ही घटना मुल येथील जुन्या रेल्वे लाइनजवळील नगर परिषदेच्या ( Chandrapur Nagar Parishad ) संकल्पित बागेसमोर शुक्रवारी (दि. 28 जानेवारी) सायंकाळी घडली.

घटनास्थळ

रवी कल्लुरवार यांच्या मालकीची प्रवासी वाहतूक करणारी चारचाकीने ( क्रं. एम एच 34 डी 2455 ) बंद असताना अचानक पेट घेतला. यावेळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या इतर चालकांनी वाळू व पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. पण, आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांचे प्रयत्न विफल ठरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ( Chandrapur Police ) घटनास्थळी धाव घेतली. पण, अग्नीशमन पथक ( Chandrapur Fire Brigade ) लवकर न पोहोचल्याने नगर परिषदेचे ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आले.

हेही वाचा - Chandrapur Accident : क्रेटा आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात भाजप जिल्हा सचिवाचा मृत्यू; एक गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.