ETV Bharat / state

पोंभुर्णात साकारणार चार कोटींचे खुले नाट्यगृह; सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार - सुधीर मुनगंटीवार बातमी

पोंभुर्णा शहरात बांधण्‍यात येणाऱ्या खुल्‍या नाट्यगृहाच्‍या माध्‍यमातून या परिसरातील नागरिकांना मोठे सांस्‍कृतीक व्‍यासपीठ उपलब्‍ध होणार असून कलावंतांच्‍या कलाविष्‍काराला योग्‍य दालन उपलब्‍ध होणार आहे. प्रामुख्‍याने झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटके या भागात बघण्‍यासाठी हक्‍काचे व्‍यासपीठ या खुल्‍या नाट्यगृहाच्या माध्‍यमातून उपलब्‍ध होणार आहे.

पोंभुर्णात साकारणार चार कोटींचे खुले नाट्यगृह; सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
open-theater-to-be-set-up-in-pombhurna-said-sudhir-mungantiwar-in-chandrapur
author img

By

Published : Oct 17, 2020, 10:45 PM IST

चंद्रपूर - माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा शहरात चार कोटीच्या निधीतून खुल्‍या नाट्यगृहाचे बांधकाम मंजूर झाले असून या नाट्यगृहाच्‍या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार आहे. सदर नाट्यगृह बांधकामाचा आदेश सुध्‍दा निर्गमित झाला आहे. या खुल्‍या नाट्यगृहाच्‍या माध्‍यमातुन पोंभुर्णा परिसरातील सांस्‍कृतीक चळवळीसाठी हक्‍काचे व्‍यासपीठ उपलब्‍ध होणार आहे.

अर्थमंत्री म्‍हणून 2015-16 या वर्षाचा अर्थसंकल्‍प मांडताना मुनगंटीवार यांनी नवोदित कलाकारांना पुरेसा वाव मिळावा, यासाठी जिल्‍हास्‍तरावर सुसज्‍ज नाट्यगृहे बांधण्‍याचा संकल्‍प जाहीर केला होता. चंद्रपूर शहरातील अत्‍याधुनिक, वातानुकुलीत प्रियदर्शिनी नाट्यगृहापाठोपाठ बल्‍लारपूर शहरात अद्ययावत नाट्यगृह मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने साकारले आहे. मुल शहरात 8 कोटी रू. निधी खर्च करून माजी मुख्‍यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार यांच्‍या स्‍मारकासह नाट्यगृहाचे बांधकाम करण्‍यात आले आहे. आता पोंभुर्णा शहरात 4 कोटी रू. निधी खर्च करून खुले नाट्यगृह बांधण्‍यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग 2 च्‍या माध्‍यमातून लवकरच पोंभुर्णा येथील खुल्‍या नाट्यगृहाच्‍या बांधकामाला सुरूवात होणार आहे. पोंभुर्णा शहरात बांधण्‍यात येणाऱ्या खुल्‍या नाट्यगृहाच्‍या माध्‍यमातून या परिसरातील नागरिकांना मोठे सांस्‍कृतीक व्‍यासपीठ उपलब्‍ध होणार असून परिसरातील कलावंतांच्‍या कलाविष्‍काराला योग्‍य दालन उपलब्‍ध होणार आहे. प्रामुख्‍याने झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटके या भागात बघण्‍यासाठी हक्‍काचे व्‍यासपीठ या खुल्‍या नाट्यगृहाच्या माध्‍यमातून उपलब्‍ध होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.