ETV Bharat / state

चंद्रपुरात आणखी एक पॉझिटिव्ह, बाधितांची एकूण संख्या ४४ 

सुमित्रानगर तुकूम परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात 57 वर्षांच्या संशयित रुग्णामध्ये सौम्य लक्षणे दिसल्यामुळे काल त्याच्या स्वॅब नमुन्याची तपासणी करण्यात आली होती. आज या नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

चंद्रपूर
चंद्रपूर
author img

By

Published : Jun 13, 2020, 8:26 PM IST

चंद्रपूर - शहरातील तुकूम परिसरात आणखी एक कोरोनाबाधित आढळून आला आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४४ झाली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमित्रानगर तुकूम परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात 57 वर्षांच्या संशयित रुग्णामध्ये सौम्य लक्षणे दिसल्यामुळे काल (शुक्रवार) त्याच्या स्वॅब नमुन्याची तपासणी करण्यात आली होती. आज या नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

चंद्रपूर शहरामध्ये यापूर्वी बुधवारी तुकूम परिसरातील सुमित्रानगर भागातीलच रहिवासी असणारा ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आलेल्या बाधितामुळे महानगरपालिका यंत्रणेने तपासणी मोहीम आणखी सखोल केली आहे. चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे (एक बाधित), १३ मे (एक बाधित) २० मे (एकूण १० बाधित ) २३ मे (एकूण ७ बाधित ) व २४ मे (एकूण बाधित २) २५ मे (एक बाधित) ३१ मे (एक बाधित) २ जून (एक बाधित) ४ जून (दोन बाधित) ५ जून (एक बाधित) ६ जून ( एक बाधित ) ७ जून (एकूण ११ बाधित) ९ जून (एकूण ३ बाधित) १०जून (एक बाधित) आणि १३ जून (एक बाधित) अशाप्रकारे जिल्ह्यातील कोरोनाबाधित ४४ झाले आहेत. आतापर्यंत २३ बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ४४ पैकी अ‌ॅक्टिव्ह बाधितांची संख्या आता २१ झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.