ETV Bharat / state

कापूस वेचणी कामगारांच्या टेम्पोला अपघात; एक ठार, 18 जखमी - कापूस वेचणी कामगार न्यूज

पोंभुर्णा तालुक्यातील कामगार कापूस वेचणी करण्यासाठी राजुरा तालुक्यातील देवाळा येथे गेले होते. नेहमीप्रमाणे कापूस वेचणीचे काम करून घराकडे परत येत असताना त्यांचा टेम्पो पलटी झाला. यात एक महिला जागीच ठार झाला.

कापूस वेचणी कामगारांच्या टेम्पोला अपघात
कापूस वेचणी कामगारांच्या टेम्पोला अपघात
author img

By

Published : Dec 24, 2019, 8:24 PM IST

चंद्रपूर - कापूस वेचून घराकडे परतणाऱ्या कामगारांना घेऊन येणारा टेम्पो पलटी झाल्याने एक महिला कामगार जागीच ठार झाली. उषाबाई सखाराम चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात इतर 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. राजूरा तालुक्यातील लक्कडकोट येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.

अपघात झालेला टेम्पो
अपघात झालेला टेम्पो

पोंभुर्णा तालुक्यातील कामगार कापूस वेचणी करण्यासाठी राजुरा तालुक्यातील देवाळा येथे गेले होते. नेहमीप्रमाणे कापूस वेचणीचे काम करून घराकडे परत येत होते. त्यांचा टेम्पो एका ट्रकला ओव्हरटेक करताना पलटी झाला. टेम्पोत एकूण 19 कामगार बसलेले होते. त्यात कापूसही भरलेला होता आणि त्यावर कामगार बसले होते. त्यामुळे टेम्पो पलटी झाल्यानंतर कामगार बाजूला फेकले गेले. यात उषाबाई सखाराम चौधरी या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - 2019 : वर्षभरात हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांकडून तब्बल 81 कोटींचा दंड वसूल

ही घटना झाल्यानंतर तत्काळ रुग्णवाहिका बोलवण्यात आली. जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.

Intro:कापुस वेचणी मजूरांना घेवून जाणारा टेंम्पो पलटला;एक महीला ठार,18 जखमी

चंद्रपूर

गावाजवळील शेतात कापूस वेचून घराकडे परत येत असताना कामगारांना घेऊन येणारा टेम्पो पलटी झाल्याने एक महिला कामगार जागीच ठार झाली. तर 18 जण जखमी झाले आहेत.ही घटना आज दिनांक 24 डिसेंबरला सायंकाळी चारच्या सुमारास चंद्रपुर जिल्ह्यातील राजूरा तालूक्यात येणाऱ्या लक्कडकोट येथे घडली.
जखमींना उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.
उषाबाई सखाराम चौधरी असे मृतक महीलेचे नाव आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील कामगार कापूस वेचणी करण्यासाठी राजुरा तालुक्यातील देवाळा येथे आलेले होते. देवाडा येथे भाड्याची खोली करून कामगार मागिल पंधरा दिवसापासून राहत होते. लक्कडकोट येथील शेतात नेहमी प्रमाणे कापूस वेचणी चे काम करून घराकडे परत येत असताना टेम्पो गाडी ( एम एच 34 बिजी 2648 ) जुन्या आरटीओ नाक्याजवळ एका ट्रकने ओव्हरटेक करताना पलटी खाला. टेम्पोत एकूण 19 कामगार बसलेले होते. टेम्पोत कापूस भरलेला होता व त्यावर कामगार बसलेले असल्यामुळे टेम्पो पलटी खाल्यानंतर कामगार बाजूला फेकल्या गेलेत. यात उषाबाई सखाराम चौधरी या महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर उर्वरित 18 जण जखमी झालेत. ही घटना कळताच तात्काळ रुग्णवाहीका बोलविण्यात आली.जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. पुढील तपास राजुरा पोलिस करीत आहे.Body:फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.