चंद्रपूर - वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी अभयारण्यातील आगरझरी येथे असलेल्या एका खासगी रिसॉर्टच्या मागे नवजात शिशु सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (8 जानेवारी) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांना माहिती देण्यात आली असून याचा तपास सुरू आहे.
- पोलिसांकडून तपास सुरू -
आगरझरी येथील एका खासगी रिसॉर्टमध्ये बाहेरील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे हा नवजात शिशु कोणी टाकून दिला, या बाबत शंका कुशंका व्यक्त करण्यात येत आहेत. नवजात शिशु सुखरूप असून, दिसायला गोंडस असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना उघळकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.