ETV Bharat / state

जिल्ह्यात आज २४५ कोरोनाग्रस्त आढळले; एकूण रुग्णांची संख्या पोचली १६५७ वर - चंद्रपूर जिल्हा कोरोनाची सद्यस्थिती

चंद्रपूर जिल्ह्यात २४५ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या पोचली १६५७ वर पोहोचली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात २४५ कोरोनाबाधीत
author img

By

Published : Mar 25, 2021, 8:04 PM IST

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ६६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर २४५ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २६ हजार ४८९ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ४१७ झाली आहे. सध्या १६५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ६३ हजार ९४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ३०हजार ४१२ नमुने निगेटीव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील जयराज नगर येथील ८३ वर्षीय पुरूष व वाल्मिक नगर येथील ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४१५ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३७६, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधीत आलेल्या २४५ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील ७४, चंद्रपूर तालुका २३, बल्लारपूर १२, भद्रावती १८, ब्रम्हपुरी दोन, नागभिड पाच, सिंदेवाही पाच, मूल सहा, सावली सहा, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी तीन, राजूरा सात, चिमूर १३, वरोरा ४६, कोरपना १९, जिवती एक व इतर ठिकाणच्या चार रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा - काही पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर चुका केल्या, त्यांच्यावर कारवाई होणारच - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.