ETV Bharat / state

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर टीका, म्हणाले... - नांदेड, अमरावती,(Amravati Violence) मालेगाव सारख्या ठिकाणी दंगली

जे देश चालवत आहेत म्हणतात, ज्यांच्या हातात पाच वर्षे या राज्याची सूत्रे होती, ते सत्ता गेल्यानंतर असे भ्रमिष्टासारखा वागतो. चुकीचे धोरण अवलंबतो याचे उदाहरण अमरावतीमध्ये घडलेल्या घटनेत दिसून आले, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते मूल येथे जाहीर सभेत बोलत होते.

शरद पवार
शरद पवार
author img

By

Published : Nov 19, 2021, 12:18 AM IST

Updated : Nov 19, 2021, 12:51 AM IST

चंद्रपूर - त्रिपुरा सारख्या राज्यात संघर्षाची स्थिती निर्माण होते आणि नांदेड, अमरावती,(Amravati Violence) मालेगाव सारख्या ठिकाणी दंगली होतात. या दंगली होण्याचे नेमके कारण काय? पोलीस त्याची चौकशी करतील आणि वस्तुस्थिती लवकरच बाहेर येईल. मात्र, पहिल्या दिवशी दंगल झाल्यानंतर ज्यांचा हातात देशाची सत्ता आहे. त्यांच्या विचारसरणीच्या लोकांनी वेगळ्या पद्धतीची दंगल केली. जे देश चालवत आहेत म्हणतात, ज्यांच्या हातात पाच वर्षे या राज्याची सूत्रे होती, ते सत्ता गेल्यानंतर असे भ्रमिष्टासारखा वागतो. चुकीचे धोरण अवलंबतो याचे उदाहरण अमरावतीमध्ये घडलेल्या घटनेत दिसून आले, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. ते मूल येथे जाहीर सभेत बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

'सत्ता म्हणजे समाजाचा व्यापक विचार'

आज देशात भाजपाची सत्ता आहे. सत्ता हातात आली तर समाजाचा व्यापक पद्धतीने विचार करावा लागतो. धर्म, जाती, भाषा याच्यामध्ये अंतर होता कामा नये, याची काळजी घेता आली पाहिजे, असेही ते म्हणाले. सत्ता म्हणजे जबाबदारी, मात्र सत्ता असताना सामाजिक ऐक्याला सुरुंग लावण्याचे काम जो कोणी राजकीय पक्ष करतो, त्याला राज्य आणि देशात सत्ताधारी होऊ द्यायचे नाही, हा विडा आपण उचलला आहे, असेही पवार म्हणाले. कोणी म्हणत की पेट्रोल-डिझलचे वाढते भाव हे केवळ काही लोकांना प्रभावित करतात. याचा जनसामान्यांना काहीही फरक पडत नाही, हे चुकीचे आहे. गरीबाच्या अनधान्यापासून तर भाजीपाल्यापासून याची किंमत निर्भय करते. ज्याचा बोजा सामान्य नागरिकांना पडतो, असेही शरद पवार म्हणाले.

'त्यागाची भरपाई व्याजासकट परत घेणार'

चंद्रपूर लोकसभा आणि विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीला एकदाही संधी देण्यात आली नाही. मात्र जिथे ज्या राजकीय पक्षाचे राजकीय बाहुल्य असते. तिथे त्यांना ती संधी द्यावी लागते. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला संधी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्या निकषानुसार संधी मिळाली नाही. आघाडी भूमिका टिकवायची आहे. केवळ हीच भूमिका यामागे होती. आम्ही त्याग केला. मात्र त्याग हा एकच वेळा करायचा असतो. पुढील आगामी निवडणुकीत आम्ही त्या त्यागाची भरपाई वसूल केल्याशिवाय राहणार नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.

'...पण धीर सोडायचा नसतो'

आज चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक नेते राजकीय स्वार्थापोटी राष्ट्रवादी सोडून गेले. मात्र जे सोडून गेले त्यांची चिंता करायची नसते. 1978 च्या निवडणुकीत काँग्रेसचे 60 लोक निवडून आलेत. पुढील सहा महिन्यात तब्बल 54 लोक ही पक्ष सोडून गेलीत. मात्र आम्ही धीर सोडला नाही. पुढच्या निवडणुकीत तब्बल 54 च्या 54 लोकांना आम्ही पराभुत केले. त्यामुळे कोण पक्ष सोडून गेले याची चिंता करू नका, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा - Sharad Pawar on ST Strike : कर्मचाऱ्यांनो संप मागे घ्या, आडमुठेपणा सोडा; शरद पवारांचे आवाहन

Last Updated : Nov 19, 2021, 12:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.