चंद्रपूर - खेमाजी नाईक माध्यमीक आश्रम शाळेचे अधीक्षक सुभाष पवार यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणातील काही मागण्यांना घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण मागील सहा दिवसापासून सुरु होते. दरम्यान, सोमवारी खासदार बाळू धानोरकर यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.
धानोरकर यांनी पिडीत लता सुभाष पवार यांच्या कुटुंबियांच्या मागण्या पूर्ण करून या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करा, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, प्रभारी जिल्हाधीकारी राहुल कर्डीले, जिल्हा समाजकल्याण सहा. आयुक्त प्रसाद कुलकर्णी याना दिले आहेत.यावेळी पिडीत कुटुंबाचे नातेवाईक तसेच विदर्भ माध्यमीक शिक्षण संघाचे सर कार्यवाह सुधाकर अडबाले, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, जिल्हा अध्यक्ष केशवराव ठाकरे, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, सामाजीक कार्यकर्ते सूर्यभान अडबाले हे उपस्थीत होते.
हेही वाचा - आज के शिवाजी.. तर शिवरायांच्या वंशजांनी पदांचे राजीनामे द्यावेत
दरम्यान, लता सुभाष पवार यांना लिंबूसरबत प्यायला देऊन त्यांच्या मागील सहा दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाची सांगता खासदार बाळू धानोरकर यांनी केली. तसेच, या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करण्याचे निर्देश देखील धानोरकर यांनी दिले आहेत.