ETV Bharat / state

'चोप' प्रकरण मनसे कार्यकर्त्यांच्या अंगलट; 'त्या' व्यवस्थापकाचा आत्महत्येचा प्रयत्न

महिंद्रा होम फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक चेतन याने मंगळवारी एका सहकारी महिलेविषयी अश्लील शब्द वापरले, तसेच तो काम करतानाही त्रास देतो, अशा महिलेच्या तक्रारीवरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन चेतन दाते याला त्याच्या पत्नीसमोर जबर मारहाण केली.

चंद्रपूर
author img

By

Published : Mar 8, 2019, 10:32 PM IST

चंद्रपूर - महिंद्रा फायनान्स कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील व्यवस्थापकाला जबर मारहाण केली होती. यानंतर व्यवस्थापकाची मानसिक स्थिती ढासळली. त्यामुळे तो अद्याप कंपनीत रुजू झालेला नाही. या घटनेनंतर त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला. पक्षश्रेष्ठीकडे याची तक्रार गेल्यामुळे, आता हे प्रकरण मारहाण करणाऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

महिंद्रा होम फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक चेतन याने मंगळवारी एका सहकारी महिलेविषयी अश्लील शब्द वापरले, तसेच तो काम करतानाही त्रास देतो, अशा महिलेच्या तक्रारीवरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन चेतन दाते याला त्याच्या पत्नीसमोर जबर मारहाण केली. या प्रकरणावर, मनसे कार्यकर्त्यांनी काहीही शहानिशा न करता मारहाण केली, असे व्यवस्थापक चेतन दाते यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

महिला सेलच्या प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, भरत गुप्ता, सुयोग धनवलकर यांनी ही मारहाण केली. ज्या पद्धतीने ही मारहाण करण्यात आली, ती अयोग्य होती अशी चर्चा जिल्हा मनसेच्या अंतर्गत गोटात आहे. ज्या ध्वनिफितीवरून ही मारहाण करण्यात आली. त्यात कार्यालयातील कामकाज आणि अंतर्गत गटबाजीबाबत चर्चा आहे. यात असलेले सर्व दारूच्या नशेत आहेत. आपल्याला नोकरी करायची असेल तर त्या दोन महिला कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाक, असे म्हणत चेतन दाते एका महिला कर्मचाऱ्याबाबत अश्लील शब्द वापरतो.
आपल्या पाठीमागे झालेल्या संभाषणाची ध्वनिफित पीडित महिलेला मिळाली. तिने आपल्या वरिष्ठांकडे अथवा पोलिसात तक्रार करण्याऐवजी थेट मनसेच्या प्रतिमा ठाकूर यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर कायदा हातात घेत त्यांनी दातेला मारहाण केली. आपल्याला सर्वांसमोर मारहाण करण्यात आली या भावनेने दातेची मानसिक स्थिती बिघडली. त्याने आत्महत्येचा प्रयत्नदेखील केला. याबाबत दातेचे साळू विक्की कोरडे यांनी मनसेच्या पदाधिकऱ्यांना याची माहिती दिली.
जे केले ते योग्यच केले, असा पवित्रा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. विक्की कोरडे हे रामटेक क्षेत्रातील मनसेचे तालुकाध्यक्ष आहेत. त्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. अश्लील शब्द दुसऱ्याने वापरले असतानाही दाते याला जबर मारहाण करण्यात आली. ध्वनिफितीत केवळ कार्यालयातील गटबाजीची चर्चा आहे. असे असतानाही दाते यांना चुकीच्या पद्धतीने जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे मुंबई येथील पक्षश्रेष्ठीकडे आपण तक्रार करणार आहोत, तशी बोलणी सुरू आहे, असे कोरडे यांनी सांगितले. हे प्रकरण आता मारहाण करणाऱ्या मनसे पदाधिकऱ्यांच्या अंगलट येऊ शकते.

Intro:चंद्रपूर : महिंद्रा फायनान्स कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील व्यवस्थापकाला जबर मारहाण केली होती. त्या व्यवस्थापकाची मानसिक स्थिती ढासळली असून तो अद्याप कंपनीत रुजू झालेला नाही. एवढेच नाही तर त्याने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. काहीही शहानिशा न करता मारहाण करण्यात आली असे व्यवस्थापक चेतन दाते यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानुसार मनसेच्या पक्षश्रेष्ठीकडे याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण मारहाण करणाऱ्याना चांगलेच शेकणार असल्याचे दिसून येत आहे.

Body:सध्या निवडणूक जवळ आल्याने एरव्ही कोणी न विचारणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना पेव फुटला आहे. आपले नाणे खणखणीत वाजविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

5 मार्च मंगळवारी महिंद्रा होम फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक चेतन याने एका सहकारी महिलेविषयी अश्लील शब्द वापरले तसेच तो काम करताना त्रास देतो अशा महिलेच्या तक्रारीवरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन चेतन दाते याला त्याच्या पत्नीसमोर जबर मारहाण केली. महिला सेलच्या प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, भरत गुप्ता, सुयोग धनवलकर यांनी ही मारहाण केली. ज्या पद्धतीने ही मारहाण करण्यात आली ती अयोग्य होती अशी चर्चा जिल्हा मनसेच्या अंतर्गत गोटात आहे. ज्या ध्वनिफितीवरून ही मारहाण करण्यात आली. त्यात कार्यालयातील कामकाज आणि अंतर्गत गटबाजीबाबत चर्चा आहे. यात असलेले सर्व दारूच्या नशेत तर्रर्र आहेत "आपल्याला नोकरी करायची असेल तर त्या दोन महिला कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाक" असे म्हणत चेतन दाते एका महिला कर्मचाऱ्याबाबत अश्लील शब्द वापरतो. आपल्या पाठीमागे झालेल्या संभाषणाची ध्वनिफित पीडित महिलेला मिळाली. तिने आपल्या वरिष्ठांकडे अथवा पोलिसांत तक्रार करण्याऐवजी थेट मनसेच्या प्रतिमा ठाकूर यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर कायदा हातात घेत दातेला चोप देण्यात आला. आपल्याला सर्वांसमोर मारहाण करण्यात आली या भावनेने दातेची मानसिक स्थिती बिघडली. त्याने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. याबाबत दातेचे साळू विक्की कोरडे यांनी मनसेच्या पदाधिकऱ्यांना याची माहिती दिली. मात्र, जे केले ते योग्यच केले असा पवित्रा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. विक्की कोरडे हे रामटेक क्षेत्रातील मनसेचे तालुकाध्यक्ष आहेत. त्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. "अश्लील शब्द दुसऱ्याने वापरले असतानाही दाते याला जबर मारहाण करण्यात आली. ध्वनिफितीत केवळ कार्यालयातील गटबाजीची चर्चा आहे. असे असतानाही दाते यांना चुकीच्या पद्धतीने जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे मुंबई येथील पक्षश्रेष्ठीकडे आपण तक्रार करणार आहोत, तशी बोलणी सुरू आहे" असे कोरडे यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे मानसिक स्थिती धरल्याने चेतन दाते हा अद्याप कंपनीत रुजू झाला नाही.

Conclusion:त्यामुळे हे प्रकरण आता मारहाण करणाऱ्या मनसेच्या पदाधिकऱ्यांवर अंगलट येऊ शकते. एखाद्याच्या पाठीमागे अश्लील शब्द वापरल्याच्या आरोपावरून त्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी इतकी जबर मारहाण यावर अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.