चंद्रपूर - जिल्ह्यातील गडचांदूर-राजुरा या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने सुरू असतात. तर, विविध कंपन्यांचे ट्रान्स्पोर्ट याच मार्गावर असल्याने मुख्य रस्त्यावरच ही जड वाहने उभी केली जातात. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा आणि अवैध पार्किंगचा नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतो. तसेच या मार्गावर अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या सर्व प्रकाराविरोधात शनिवारी मनसेने धरणे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना तालुक्यात दोन सिमेंट निर्मिती उद्योग आहेत. उद्योगासाठी लागणाऱ्या विविध साहीत्याची ने आन करणारी जड वाहने दिवसरात्र धावत असतात. विशेष म्हणजे उद्योगांतील जड वाहने राजुरा-गडचांदूर मार्गावर दुतर्फा उभी केली जातात. तर, हीच परिस्थिती गडचांदूर येथील मुख्य मार्गाची असून याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. या जड वाहनांमुळे रस्त्यावर वाहतूक करताना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून लहान-मोठ्या अपघातंच्या संख्येत वाढ होत आहे. तर प्रशासन मात्र या बाबींकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. या सर्व प्रकारावर आळा बसण्साकरता तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने धरणे आंदोलन केले होते. हे आंदोलन मनसेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन पार पडले.
हेही वाचा - गरीब वयोवृध्दाच्या अंत्यसंस्कारासाठी गाव सरसावले
हेही वाचा - चंद्रपूर : वनक्षेत्रातील खोदतळ्यांना कुंपण; वनविभागाचे अजब धोरण