चिमूर (चंद्रपूर) - कोरोना 19च्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे ऑटो चालकांना कुटुंब चालवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. तेव्हा आमदार बंटी भांगडिया यांची भेट ऑटो चालकांनी घेत मदतीची याचना केली होती. यावर तत्काळ आमदार बंटी भांगडिया यांनी किराणा किटच्या माध्यमातून मदत केली.
यांच्या हस्ते भेट -
किराणा किट देत असतांना भाजपाचे तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, रमेशजी कंचर्लावार, श्रेयस लाखे अरुण लोहकरे राकेश कामडी, रामदास हेमके उपस्थित होते.
संघटनेतर्फे मदतीची मागणी -
चिमूर नवीन बसस्थानक जवळ ऑटोचालक आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक बंद असल्याने त्यांना कुटुंब चालवणे कठीण झाले होते. ऑटो चालक संघटनेचे सुरेश बंगारे यांच्या वतीने आमदार बंटी भांगडिया यांना मदतीसाठी लेखी निवेदन दिले होते. तेव्हा आमदार भांगडिया यांनी किराणा किटच्या स्वरूपात मदत केली.
या ऑटो चालकांना केली मदत -
प्रकाश डांगे, कृषी गिरडे, सुरेश देवतळे, राजू गराटे, धनराज डांगे, सुरेश बंगारे, नाना देवतळे, संतोष डांगे, प्रेमदास डांगे, अनुच गेडाम, शुभम देवतळे, रमेश कोलते, समीर शेख, अमित झोडापे, आशिष शेख, नवाब शेख यांना किराणा स्वरूपात मदत करण्यात आली. ऑटो चालक संघटनेचे सुरेश बंगारे यांनी आमदार बंटी भांगडियांच्या मदती बद्दल आभार व्यक्त केले.