चंद्रपूर Millet Khichadi Record : विष्णू मनोहर हे ख्यातनाम शेफ आहेत. यापूर्वी देखील त्यांनी विश्वविक्रम केले आहेत. 2023 हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष' म्हणून जाहीर केलं आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर यांनी 12 बारा विक्रम करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार त्यांनी यापूर्वी नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक येथे विक्रम केला. यापूर्वी त्यांनी नागपुरात 6500 किलोची खिचडी तयार केली होती. आज चंद्रपूर येथे हा विक्रम मोडीत काढत त्यांनी 6750 किलोची खिचडी तयार केली.
अयोध्येत होणार सर्वांत मोठा विश्वविक्रम : अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणाच्या वेळी आतापर्यंतचा सर्वांत मोठा विक्रम होणार आहे, अशी माहिती शेफ मनोहर यांनी दिली.
आठ हजार किलो हलवा बनणार : अयोध्या येथे तब्बल आठ हजार किलोचा हलवा तयार करण्यात येणार असल्याची माहिती विष्णू मनोहर यांनी दिली. चंद्रपूर येथे विक्रमासाठी दहा बाय दहाच्या लोखंडी कढईचा उपयोग करण्यात आला. मात्र, अयोध्येसाठी तब्बल 15 फूट बाय 15 फूट इतकी मोठी कढई असणार आहे.
अशी होते तयारी : 'ईटीव्ही' भारतशी बोलताना विष्णू मनोहर यांनी असे विक्रम करतानाच्या आव्हानाबाबत सांगितलं. प्रत्येक ठिकाणच्या गोष्टींचा वेगळेपणा असतो. म्हणूनच मनोहर हे आधी तिथले पाणी, अन्नधान्य मागवतात. ते आधी नागपुरात शिजवून घेतात. त्याचे वेगवेगळे प्रयोग करून बघतात. यानंतर ते विक्रम करण्यास सज्ज होतात.
शाळांना खिचडीचे वाटप : 6750 किलोच्या खिचडीचे वाटप शहरातील मनपाच्या शाळांत करण्यात आले. तसंच तिथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना देखील याचे वाटप करण्यात आले.
हेही वाचा: