चंद्रपूर - लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना घेवून राजुऱ्यातून दहा बसेस रवाना झाल्या आहेत. नगरपरिषदेने बसेसचे निर्जंतुकीरण केले. तब्बल दीड महिने घरापासून लांब राहीलेले मजूर आता घर गाठणार आहेत. या पहिल्या फेरीत दोनशे वीस मजूर रवाना झाले आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी एका बसमध्ये बावीस मजुरांना बसवण्यात आले होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात टाळेबंदी लागू केली आहे. राज्य, जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मजूरीसाठी परप्रांतात गेलेले कामगार, मजूर हे तिकडेच अडकून पडले होते. लॉकडाऊन दरम्यान मजूरांचे मोठे हाल झाले. त्यामुळे, अडकून पडलेल्या मजूरांसाठी शासनाने ठोस पाऊले उचलत असून या मजूरांना त्यांचा गावाला पोहचवण्यात येत आहे.
राजुरा तालुक्यात छत्तीसगड राज्यातील अडकून पडलेल्या मजुरांना घेऊन आज (रविवार) दहा बसेस रवाना झाल्या. यावेळी मजूरांची तपासणी करुन, त्यांना मास्क आणि बिस्किटही देण्यात आले.
हेही वाचा : दिलासादायक..! बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त, आतापर्यंत सर्व २३ रूग्णांना डिस्चार्ज