ETV Bharat / state

धक्कादायक! विवाहित पुरुषाने केला प्रेयसीचा खून, केले आत्मसमर्पण

author img

By

Published : Nov 1, 2020, 3:54 PM IST

अनेकदा व्यक्ती रागाच्या भरात गुन्हे करून बसतो. अशीच एक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीचा खून केला. त्यानंतर तो स्वत:चा पोलिसांकडे गेला.

Murder
खून

चंद्रपूर - जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका विवाहित पुरुषाने आपल्या प्रेयसीची लाकडाच्या दांडक्याने खून केल्याची घटना जुनोना चौक परिसरात घडली. खून केल्यानंतर आरोपीने स्वतः आत्मसमर्पण केले आहे. राकेश ढोले (वय ३२) असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपी आहे विवाहित -

आरोपी राकेश ढोले याचा विवाह झाला असून त्याला दोन मुले आहेत. मात्र, त्याचे मृत महिलेसोबत प्रेम संबंध जुळल्याने तो पत्नीपासून वेगळा राहत होता. मागील 8 महिन्यापासून तो प्रेयसीसोबतच राहत होता. याकारणावरून राकेशचे त्याच्या पत्नीसोबत नेहमी वाद होत. तरीही त्याची पत्नी वारंवार संपर्क साधत त्याला घरी येण्याची विनंती करत होती.

राग अनावर झाल्याने केला खून -

प्रेयसीसोबत 8 महिन्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना आरोपी राकेशचा तिच्याशी देखील नेहमी वाद होत. आज सकाळी राकेशची पत्नी त्याच्या जूनोना चौकातील घरी गेली. यावेळी तिघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वाद खूप वाढल्याने राकेशने आपल्या पत्नीला गावी पाठवून दिले. त्यानंतर पुन्हा राकेश आणि त्याच्या प्रेयसीचे कडाक्याचे भांडण झाले. या वादात राकेशने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यावर जोरदार वार केला. यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर राकेशने स्वतः रामनगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.