चंद्रपूर- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील युवकाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मोहन संतोष वांढरे (२८) असे मृत युवकाचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालूक्यातील नारंडा येथील मोहन वांढरे यांनी सर्व कुटुंबीय झोपेत असताना विष प्राशन केले होते. रविवारच्या मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कुटूंबियांनी उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालय, कोरपना येथे दाखल केले. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान सोमवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास कोरपना पोलीस करत आहेत.