ETV Bharat / state

तक्रारदाराने केली पोलीस ठाण्यात आत्महत्या - चंद्रपूर गुन्हे बातमी

तक्रार देण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या आवारात घडली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

सिंदेवाही पोलीस ठाणे
सिंदेवाही पोलीस ठाणे
author img

By

Published : Jan 6, 2021, 4:47 PM IST

चंद्रपूर - तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराने पोलीस ठाण्याच्या परिसरातच गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. अशोक राऊत, असे मृत व्यक्तीचे आहे. ही घटना सकाळच्या सुमारास घडली.

मृत अशोक राऊत (वय 55 वर्षे) बुधवारी (दि. 6 डिसें.) सकाळी सिंदेवाही पोलीस ठाण्यात आले होते. घरगूती वादातून आपल्या भाऊ आणि मामा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ते पोलीस ठाण्यात आले होते. मात्र, त्यांना यासाठी बाहेर बसण्यासाठी सांगण्यात आले. याच दरम्यान त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना लक्षात येताच अशोक राऊत यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आत्महत्या नेमकी कशासाठी झाली, यामागे येथील पोलीस प्रशासनाची अनास्था जबाबदार आहे का? हे सारे प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र, याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा - भद्रावतीमध्ये कोंबडबाजारावर छापा, 6 जणांना अटक

हेही वाचा - पोलीस महानिरीक्षकांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील कोंबडबाजार बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.