चंद्रपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षात लोकहिताच्या विविध योजना राबविल्या. यात गरीब कल्याणाच्या योजनांवर त्यांनी विशेष भर दिला आहे. तळागाळातील सामान्य माणसाच्या चेह-यावर आनंद फुलावा, शेतकरी समृध्द व्हावा यासाठी मोदीजींनी अनेक निर्णय देखील घेतले. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजयी झेंडा पुन्हा एकदा फडकेल ((Lotus will bloom again in Chandrapur Lok Sabha)), असा विश्वास देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी व्यक्त केला (Union Minister Hardeep Singh Puri confident ).
बल्लारपूर विधानसभा - बल्लारपूर येथे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या संघटनात्मक बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधताना केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी बोलत होते. यावेळी राज्याचे वन व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, हरीश शर्मा, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेश बकाने, सुदर्शन निमकर, जैनुद्दीन जव्हेरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
गोंडराजाच्या समाधी स्थळी भेट - यावेळी हरदीपसिंह पुरी यांनी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच यांच्याशी संवाद साधला. तत्पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना त्यांनी हार घालून अभिवादन केले. यादरम्यान तिलक वार्ड बल्लारपूर येथील रामहित वर्मा या हमाल काम करणा-या व्यक्तीच्या घरी पुरी यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांच्याशी संवाद साधला. बल्लारपूर येथील खांडक्या बलाळशाह या गोंडराजाच्या समाधी स्थळी भेट देत पुरी यांनी अभिवादन केले.
सैनिक शाळेला हरदीपसिंह पुरी यांनी भेट दिली - देशातील अत्याधुनिक अशा सैनिक शाळेला हरदीपसिंह पुरी यांनी भेट दिली व पाहणी केली. या सैनिक शाळेचे एकूणच स्वरूप भव्य व नेत्रदीपक आहे. देशाच्या संरक्षणाच्या प्रक्रियेत ही सैनिक शाळा मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन पुरी यांनी केले. या सैनिक शाळेच्या निर्मीतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल वने व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे त्यांनी अभिनंदन व कौतुक केले. त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने आत्तापासूनच लोकसभेचे पडघम सुरू झाले आहेत.